Lokmat Sakhi >Beauty > १ चमचा सालीची मुगडाळ आणि ५ फेसपॅक, चेहऱ्यावर चमक हवी तर करा १० मिनिटांचा सोपा उपाय...

१ चमचा सालीची मुगडाळ आणि ५ फेसपॅक, चेहऱ्यावर चमक हवी तर करा १० मिनिटांचा सोपा उपाय...

5 Moong Dal Face Packs For Healthy & Glowing Skin : मुगडाळ आपण खातोच पण त्यातले अत्यंत पौष्टिक घटक त्वचेच्या सर्व समस्यांवर गुणकारी व औषधी ठरतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 02:43 PM2023-07-27T14:43:15+5:302023-07-27T15:11:43+5:30

5 Moong Dal Face Packs For Healthy & Glowing Skin : मुगडाळ आपण खातोच पण त्यातले अत्यंत पौष्टिक घटक त्वचेच्या सर्व समस्यांवर गुणकारी व औषधी ठरतात.

Try These 5 Moong Dal Face Pack for Sun Tan, Fairness and Marks Removal. | १ चमचा सालीची मुगडाळ आणि ५ फेसपॅक, चेहऱ्यावर चमक हवी तर करा १० मिनिटांचा सोपा उपाय...

१ चमचा सालीची मुगडाळ आणि ५ फेसपॅक, चेहऱ्यावर चमक हवी तर करा १० मिनिटांचा सोपा उपाय...

आपल्या आहारात आपण नेहमी डाळींचा समावेश करतो. डाळींमधील पोषक तत्व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असतात. डाळी खाल्ल्यामुळे जसे आपले शरीर सुदृढ राहते तसेच डाळींचा वापर आपल्या चांगल्या त्वचेसाठी देखील करु शकतो. आपली त्वचा अधिक सुंदर दिसावी असे प्रत्येकालाच वाटत असते आणि त्यासाठी आपण अनेक घरगुती उपायही करून पाहतो. त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण वेगवेगळे औषधी गुणधर्म असलेल्या डाळींचा  वापर करतो. त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण मसूर डाळ, चणा डाळ यांसारख्या अनेक डाळींच्या पिठाचा वापर करतो. 

रोजच्या वापरातल्या या सर्व प्रकारच्या डाळींसोबतच हिरव्या मूग डाळीला आयुर्वेदात विशेष महत्व आहे. इतर डाळीपेक्षा ही डाळ अधिक पौष्टिक आणि शक्तिशाली मानली जाते. खाण्याव्यतिरिक्त या डाळीत अनेक नैसर्गिक गोष्टी मिसळून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचे सौंदर्य खुलून येण्यास अधिक मदत होते. जितके त्वचेचे प्रकार असतात तितक्याच त्याच्या समस्या देखील अधिक असतात. त्वचेसाठी वरदान असलेल्या या हिरव्या मूग डाळीचा वापर करुन आपण आपले त्वचेचे सौंदर्य जपू शकतो. त्वचेच्या कोणत्या प्रकारच्या समस्येसाठी हिरव्या मूग डाळीचा कोणता फेसपॅक वापरावा, हे पाहूयात(Try These 5 Moong Dal Face Pack for Sun Tan, Fairness and Marks Removal).

त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी हिरव्या मुग डाळीचे फेसपॅक :- 

१. सन टॅन, निस्तेज त्वचा, मुरुम किंवा कोरडी त्वचा यांच्यासाठी फेसपॅक :- 

४ चमचे मूग डाळीची बारीक पेस्ट बनवून घ्यावी. आता त्यात २ चमचे दही मिसळा. हा तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावून तसाच १० मिनिटे राहू द्यावा आणि नंतर पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा गुळगुळीत, मऊ व चमकदार होईल. याचबरोबर सन टॅनिंग, निस्तेज त्वचा, मुरुम किंवा कोरडी त्वचा यासंदर्भातील सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होईल. 

कोण म्हणतं सेंन्सिटिव्ह स्किन असेल तर हळद लावू नये? हळदीसारखे इफेक्टिव्ह काही नाही कारण...

२. तजेलदार व चमकदार त्वचेसाठी फेसपॅक :- 

४ चमचे हिरव्या सालीची मूग डाळ १ ते २ तास भिजवल्यानंतर ती मिक्सरमध्ये लावून बारीक वाटून घ्यावी.  त्यात प्रत्येकी २ चमचे संत्र्याच्या सालीची पावडर व चंदन पावडर घालावी. त्यानंतर त्यात दूध घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट १० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवल्यानंतर हलक्या हातांनी चोळून घ्यावी आणि मग पाण्याने धुवून चेहरा स्वच्छ करुन घ्यावा. 

क्रांती रेडकरच्या हायड्रा फेशियलची चर्चा, हे हायड्रा फेशियल नक्की असतं काय ?

३. पिंपल फ्री त्वचेसाठी फेसपॅक :-  

हा पॅक बनवण्यासाठी ४ चमचे मूग डाळ पेस्टमध्ये २ चमचे तूप मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा. याच्या नियमित वापराने आपल्याला पिंपल फ्री स्किन मिळेल आणि चेहराही फ्रेश व तजेलदार दिसेल. चेहऱ्यावर चमक येण्यासाठी या फेसपॅकचा वापर आपण नक्की करु शकता. 

४. त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी फेसपॅक :- 

२ चमचे भिजवलेल्या मूग डाळीची पेस्ट बनवा. त्यात १ चमचा बदाम तेल आणि थोडे मध घाला. मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होईल आणि चेहऱ्यावर चमक येईल.

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

५. त्वचेचा ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी :- 

२ चमचे भिजवलेली मूग डाळ बारीक करा. त्यात कच्चे दूध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा. या पॅकमुळे त्वचेत नैसर्गिक ओलावा टिकून राहील आणि चेहरा मुलायम होईल.

Web Title: Try These 5 Moong Dal Face Pack for Sun Tan, Fairness and Marks Removal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.