स्वयंपाकघरातील असे अनेक गोष्टी आहेत, ज्याचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून, चेहऱ्यासाठी देखील होतो. त्यात तांदुळाचा देखील समावेश आहे. तांदुळाच्या पाण्याचा वापर आपण चेहरा आणि केसांसाठी करतोच. पण आपण कधी तांदुळाच्या पिठाचा (Rice Flour for Skin) वापर चेहऱ्यासाठी करून पाहिलं आहे का? तांदुळाच्या पिठाचा वापर करून आपण अनेक पदार्थ तयार करतो.
आंबोळी, उकडीचे मोदक, डोसे यासह इतर पदार्थ केले जातात. पण याचा वापर चेहऱ्यासाठी केला तर? चेहऱ्यावरील अतिरिक्त घाण, तेल, स्किनच्या निगडीत समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरते (Skin Care). आपण त्यात एलोवेरा जेल देखील मिक्स करू शकता. पण प्रश्न असा निर्माण होतो की, यामुळे चेहऱ्यावर नितळ तेज येते का? याचा वापर चेहऱ्यावर कसा करावा? पाहूयात(Try These DIY Rice Flour Face Packs For Glowing Skin).
चेहऱ्यावर तांदुळाच्या पिठाचा फेसपॅक लावण्याचे फायदे
तांदुळाच्या पिठामध्ये अँटीऑक्सडंट गुणधर्म असतात. जे त्वचेला हानी पोचवणारे विषारी पदार्थ, डार्क स्पॉट, काळे डाग, अॅक्ने, पिग्मेण्टेशन, शिवाय बॅक्टेरिया हटवण्यास मदत करतात. यामुळे डार्क सर्कल, सुरकुत्या, शिवाय एक उत्तम एक्सफोलिएटर म्हणून काम करते. आठवड्यातून २ वेळा याचा वापर केल्यास चेहरा मुलायम होतो.
७ फूट लांब केस असलेल्या महिलेने फक्त ४ घरगुती गोष्टी वापरत राखली केसांची निगा
चेहऱ्यावर तांदुळाच्या पिठाचा फेसपॅक लावण्याची पद्धत
- तांदुळाच्या पिठाचा फेसपॅक करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ टेबलस्पून एलोवेरा जेल घ्या, त्यात ३ चमचे तांदुळाचं पीठ आणि थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
- पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तयार पेस्ट चेहऱ्यावर हाताने लावा. फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघेल, शिवाय मुलायम, ग्लो करेल. आपण या फेसपॅकचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. तांदुळाच्या पिठातील गुणधर्मामुळे चेहरा ग्लो करेल.