Lokmat Sakhi >Beauty > तांदुळ धुवून पाणी फेकून देण्यापेक्षा करा कोरियन आईस क्युब्स, त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी !

तांदुळ धुवून पाणी फेकून देण्यापेक्षा करा कोरियन आईस क्युब्स, त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी !

Rice Water Ice cubes for Skin Whitening, Anti Aging, Dark Spots,Glowing Skin : तांदूळ धुवून आपण शक्यतो त्याचे पाणी फेकून देतो, परंतु स्किनसाठी आपण या पाण्याचा वापर करु शकतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 10:36 PM2024-07-30T22:36:45+5:302024-07-30T22:44:57+5:30

Rice Water Ice cubes for Skin Whitening, Anti Aging, Dark Spots,Glowing Skin : तांदूळ धुवून आपण शक्यतो त्याचे पाणी फेकून देतो, परंतु स्किनसाठी आपण या पाण्याचा वापर करु शकतो...

Try these Korean Ice Cubes for Crystal Clear Spotless Glass Skin Rice Water ICE CUBES for skin | तांदुळ धुवून पाणी फेकून देण्यापेक्षा करा कोरियन आईस क्युब्स, त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी !

तांदुळ धुवून पाणी फेकून देण्यापेक्षा करा कोरियन आईस क्युब्स, त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी !

आपली त्वचा नितळ, चमकदार असावी असे आपल्याला कायम वाटत असते. आपली त्वचा कायम सुंदर दिसावी यासाठी आपण वेगवेगळे ब्यूटी प्रॉडक्टस किंवा महागड्या ट्रिटमेंट्स करुन घेतो. परंतु याचा काहीवेळा आपल्याला म्हणावा तसा फायदा झालेला दिसून येत नाही. कोरियन किंवा जापानी महिलांची त्वचा अतिशय नितळ आणि चमकदार असते. जगभरात प्रसिद्ध असलेला कोरियन ब्यूटी ट्रेंड सध्या सगळीकडेच फेमस होत आहे. आजकाल सोशल मिडियावर या कोरियन महिलांचे ब्युटी सिर्केट्स (Korean Beauty Secret)असलेले रिल्स, व्हिडिओ फार चर्चेत आहेत.कोरियन महिलांची चकचकीत, चमकती त्वचा पाहून आपली त्वचा देखील अशी व्हावी अशी आपलीही इच्छा असते. कोरियन ब्यूटी सिक्रेट,  कोरियन स्किनकेअर रुटीन आणि ब्यूटी प्रॉडक्ट्स जगभरात खूप लोकप्रिय आहेत. या महिला पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या ब्यूटी सिक्रेटचा वापर करतात(Rice Water ICE CUBES for skin).

कोरियन स्किनकेअर प्रॉडक्ट्समध्ये तांदुळाचे पाणी किंवा तांदूळ हा एक अतिशय कॉमन आणि महत्त्वाचा घटक आहे. कोरियन स्त्रिया त्यांच्या डेली स्किनकेअर रुटीनमध्ये तांदुळाचे पाणी वापरतात. सहज सोप्या असलेल्या या स्किन केअर पद्धती भारतीय महिलांमध्ये देखील खूप फेमस होत आहे. जर तुम्हालाही त्यांच्यासारखी त्वचा मिळवायची असेल तर तुम्ही तांदुळाच्या पाण्यापासून बनवलेले राईस वॉटर आईस क्युब्स वापरू शकता. चेहरा हायड्रेट आणि फ्रेश ठेवण्यासाठी तांदुळाच्या पाण्यापासून तयार केलेले आईस क्युब्स फारच फायदेशीर ठरतात. हे कोरियन राईस वॉटर आईस क्युब्स नेमके तयार कसे करावेत ते पाहूयात(Rice Water Ice cubes for Skin Whitening, Anti Aging, Dark Spots,Glowing Skin).

कोरियन राईस वॉटर आईस क्युब्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. राईस वॉटर स्टार्च - १ कप (तांदूळ शिजवून घेतल्यानंतर त्याचे उरलेले पाणी ) 
२. ग्लिसरीन - १ टेबलस्पून 
३. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून 
४. व्हिटॅमिन ई कॅप्सूल - २ कॅप्सूल 

दीपिका पदुकोणच्या फ्लॉलेस स्किनचे सिक्रेट, वापरते आयुर्वेदातील एक खास पारंपरिक गोष्ट... 


नीता अंबानींचा हेअरस्टायलिस्ट सांगतो, महिलांच्या ३ चुकांमुळेच होतात चांगले केस खराब-त्या कोणत्या?

कोरियन राईस वॉटर आईस क्युब्स कसे बनवावेत ?

एका बाऊलमध्ये तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करताना उरलेले पाणी घ्यावे. या पाण्यात प्रत्येकी १ टेबलस्पून ग्लिसरीन व एलोवेरा जेल मिक्स करुन घ्यावे. सगळ्यात शेवटी यात व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल फोडून घालाव्यात. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित ढवळून एकजीव करुन घ्यावे. आता बर्फ तयार करण्याचा ट्रे घेऊन त्यात हे तयार मिश्रण ओतून काही तास फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावे. कोरियन राईस वॉटर आईस क्युब्स वापरण्यासाठी तयार आहे. 

कोरियन राईस वॉटर आईस क्युब्स कसे वापरायचे ?

हे कोरियन राईस वॉटर आईस क्युब्स लावण्याआधी, प्रथम आपला चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर हा क्यूब चेहऱ्यावर नीट फिरवून घ्यावा.त्यानंतर बोटांनी चेहऱ्याला मसाज करावा मग स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.   

Web Title: Try these Korean Ice Cubes for Crystal Clear Spotless Glass Skin Rice Water ICE CUBES for skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.