Join us  

केसांसाठी चहा- कॉफीच्या पाण्यात मेहंदी भिजवता? त्यापेक्षा हा वेगळा प्रयोग करून बघा, केस होतील सिल्की- शायनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 2:00 PM

How to Apply Mehendi on Hair: चहा किंवा कॉफी पावडर टाकून उकळलेल्या पाण्यात आपण केसांसाठी नेहमीच मेहंदी भिजवतो. यावेळी केसांना मेहंदी लावताना हा एक वेगळा प्रयोग करून बघा. केस आणखी चकमदार दिसतील.

ठळक मुद्देकेसांना मेहंदी लावणार असाल तर यावेळी या एका वेगळ्या पद्धतीने मेहंदी भिजवून बघा केस आणखी चमकदार आणि सिल्की झालेले जाणवतील.

आजकाल केस लवकर पांढरे होत आहेत. ऐन तारुण्यात पांढरे केस डोक्यावर दिसले की सौंदर्य तर मार खातेच पण आपला कॉन्फिडन्सही कमी होऊ लागतो. बरं आता हे केस रंगविण्यासाठी बाजारात मिळणारे केमिकल डाय वापरायचीही भीती वाटते. त्यामुळे सहसा नैसर्गिक उपायाने केस रंगविण्याचा आपला प्रयत्न असतो. अशावेळी मेहंदीसारखा (How to Apply Mehendi on Hair) दुसरा उत्तम पर्याय नाही. म्हणून केसांना मेहंदी लावणार असाल तर यावेळी या एका वेगळ्या पद्धतीने मेहंदी भिजवून बघा (new method of applying mehendi/heena on hair). केस आणखी चमकदार आणि सिल्की झालेले जाणवतील. (mehendi for silky and shiny hair)

केसांना मेहंदी लावल्यानंतर अनेकांना केस रुक्ष, कोरडे झाल्यासारखे वाटतात. केस राठ होऊन जातात. असं होऊ नये, यासाठी हा उपाय नक्कीच करून पहा.

अंकिता लोखंडे लग्नानंतर वर्षभराने गेली हनिमूनला, म्हणाली नात्यातला रोमान्स कायम ठेवायचा तर दर ३ वर्षांनी.....

कारण हा उपाय केल्यानंतर केसांना नॅचरल मॉईश्चरायझर मिळतं आणि ते अधिक मऊ, मुलायम होतात. चकमदार आणि सिल्कीही दिसू लागतात. 

 

केसांसाठी कशी भिजवायची मेहेंदी?साहित्य एक वाटी मेहंदी

सारखी ॲसिडिटी, छातीत जळजळ? ८ सोपे घरगुती उपाय, चटकन मिळेल आरामअर्धी वाटी कोरफडीचा गरअर्धी वाटी कांद्याचा रस

 

कृती१. सगळ्यात आधी तर कोरफडीच्या गरामध्ये अर्धी वाटी पाणी घाला आणि ते मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या.

२. कांदा किसून किंवा मिक्सरमध्ये फिरवून त्याचं पाणी काढून घ्या.

३. आता कोरफडीच्या गराचं पाणी आणि कांद्याचं पाणी एक भांड्यात एकत्र करा आणि त्यात मेहंदी भिजवा.

सतत खोकला आणि घशात खूप खवखवतं? १ सोपा उपाय, उबळ-खवखव होईल कमी

४. एरवी मेहंदी भिजवल्यावर आपण ती ३ ते ४ तास भिजू देतो आणि नंतर केसांना लावतो. पण या पद्धतीने भिजवलेली मेहंदी लगेचच केसांना लावून घ्यावी.

५. मेहंदी लावल्यानंतर साधारण अडीच ते तीन तासांनी नुसत्या पाण्याने केस धुवून घ्यावेत. 

६. रात्री डोक्याला तेल लावून मालिश करावी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाम्पू करून केस धुवावेत.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी