आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स- मुरुमे आले की काय करु आणि काय नको असे आपल्याला होते. चेहरा आपल्या संपूर्ण शरीराचे सौंदर्य असते.(Turmeric and Colgate for dark spots) तो जर सुंदर दिसत असेल तर आपल्यात एक वेगळीच आत्मशक्ती तयार होते. अनेकदा सुंदर दिसण्यासाठी आपण महागडे पार्लर किंवा काही घरगुती उपाय करतो. (Potato juice for skin whitening)
अनेकांच्या नाकावर, गालावर किंवा कपाळावर काळे डाग यायला सुरुवात होतात.(Home remedy for pigmentation) सुरुवातीला छोटा दिसणारा हा डाग हळूहळू वाढत जातो. काही काळा चेहरा काळा दिसू लागतो. चेहऱ्यावर वांग दिसू लागतात.(Turmeric benefits for face) चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे आपले सौंदर्य अधिक कमी होत जाते.(Natural skincare for pimples) जर आपल्यालाही या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर एक सोपा घरगुती उपाय करुन पाहा. काही दिवसांतच फरक जाणवायला लागेल. (How to use potato juice for skin)
केमिकल्सला करा बाय! नॅचरल ग्लोसाठी त्वचेवर लावा बिटाचा रस- ४ सोप्या पद्धती, त्वचा होईल नितळ- चमकदार
काहींची त्वचा कोरडी, निस्तेज, तेलकट किंवा अतिसंवेदनशील असते. त्यामुळे चेहऱ्यावर काही लावताना त्यांना अधिक विचार करावा लागतो. परंतु, चेहऱ्यावरील वांग किंवा काळे चट्टे घालवायचे असतील तर हा सोपा उपाय नक्की करुन पाहा. इन्स्टाग्रामवरुन हॅण्डलवरुन प्राजक्ता साळवी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. वांग कसे घालवता येतील हे पाहूया.
जर आपल्याला चेहऱ्यावरील वांग घालवायचे असेल तर आपण एक बटाटा किसून त्याचा रस काढा. त्यामध्ये हळदी आणि कोलगेट व्यवस्थित मिसळून घ्या. आता हे मिश्रण कापसाच्या बोळ्यामध्ये भिजवून चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. बटाट्याचा रस आठवड्यातून तीन वेळा लावल्याने फायदा होतो. तसेच बटाटच्या रसाने त्वचेला अनेक फायदे होतात. टॅनिंग कमी होणे, सुरकुत्या, त्वचा उजळवण्यास आणि काळे डाग कमी करण्यास मदत होईल. यात असणारे पोटॅशियम त्वचेला घट्ट करते. डाग आणि हायपरपिग्मेंटेशन कमी करते.
डोळ्यांखाली काळी वर्तुळे जमा झाली असतील, सतत मुरुमे येत असतील आणि त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी बटाट्याचा रस फायदेशीर आहे. याचा आपण त्वचेवर वापर केल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल. हा सोपा घरगुती उपाय करुन पाहिला तर नक्की फरक जाणवेल.