Join us  

थंडी सुरु झाली-त्वचा कोरडी पडलीय? मुरुमांच्या डागांनी त्रस्त? हळदीत २ गोष्टी मिसळून बनवा फेसपॅक - चेहरा चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2023 2:20 PM

Turmeric Face Pack For Natural Glow In Winters : पार्लरमध्ये कशाला जाता? घरीच हळदीत मिसळा स्वयंपाकघरातील २ गोष्ट, फिल्टरशिवाय चेहऱ्यावर दिसेल ग्लो

बदलत्या वातावरणाचा परिणाम चेहऱ्यावर (Skin Care) होतो. सध्या थंडीचे दिवस सुरु झालेत. हवेत गारवाही जाणवत आहे. मात्र, थंडीत त्वचा फुटणे, कोरडी पडणे, खरखरीत होणे ही लक्षणे दिसतातचं. शिवाय मुरूम, चेहर्‍यावर डाग पडणे या समस्या सामान्य झालेत. हिवाळ्यात त्वचा कोरडी (Dry skin) पडू नये, शिवाय चेहऱ्याच्या इतर समस्या सोडवायच्या असतील तर, केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर न करता हळदीचा सोपा उपाय करून पाहा.

भारतीयांच्या प्रत्येक घरात हळद (Turmeric) आढळते. हळद फक्त जेवणाची चव वाढवत नसून, आरोग्य, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. हळदीच्या वापरामुळे त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. त्यामुळे हळदीत स्वयंपाकघरातील २ वस्तू घालून फेसपॅक तयार करा, व दिसा सुंदर(Turmeric Face Pack For Natural Glow In Winters).

हळद-बेसन-लिंबाचा फेसपॅक

हळद, बेसन आणि लिंबू फक्त आरोग्यासाठी नसून, त्वचेसाठीही वरदान ठरते. यासाठी एका बाऊलमध्ये एक टेबलस्पून हळद, २ टेबलस्पून बेसन आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करा. आपण त्यात गुलाब जल देखील मिक्स करू शकता. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा धुवून घ्या, तयार पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर हलक्या हाताने रगडून काढा. आठवड्यातून २ वेळा याचा वापर केल्याने चेहरा मुलायम होईल. शिवाय नैसर्गिक चमक येईल.

चेहरा उजळ पण मान काळवंडली? खोबरेल तेलाचे २ सोपे उपाय, करून तर पाहा-काही दिवसात उजळेल मान

हळदीचे फायदे

हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असता. जे त्वचेची ऍलर्जी, फोड आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करतात. हळदीची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो.

बेसनाचे फायदे

बेसनामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रथिने आढळतात. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. याचा फायदे त्वचेला देखील होतो. यामुळे स्किन क्लिअर होते.

मान-चेहरा-पाठीवरील चामखीळामुळे हैराण झालात? ४ घरगुती सोपे उपाय, काही दिवसात-न दुखवता निघेल चामखीळ

लिंबाचे फायदे

लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन बी सारखे पोषक घटक आढळतात. जे शरीराला उर्जा प्रदान करतात. लिंबूमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. लिंबाचा वापर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी