Lokmat Sakhi >Beauty > फेस वॅक्सिंग करतानाच्या वेदना का सहन करता? घरच्याघरी चिमूटभर हळद वापरुन करा वेदनारहित वॅक्सिंग

फेस वॅक्सिंग करतानाच्या वेदना का सहन करता? घरच्याघरी चिमूटभर हळद वापरुन करा वेदनारहित वॅक्सिंग

Turmeric Facial Wax -5 Minute Painless Herbal Wax घरच्याघरी फेस वॅक्सिंग करण्याची पाहा योग्य पद्धत, नकोशा केसांच्या समस्येवर उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 06:54 PM2023-03-13T18:54:13+5:302023-03-13T18:55:23+5:30

Turmeric Facial Wax -5 Minute Painless Herbal Wax घरच्याघरी फेस वॅक्सिंग करण्याची पाहा योग्य पद्धत, नकोशा केसांच्या समस्येवर उत्तर

Turmeric Facial Wax -5 Minute Painless Herbal Wax | फेस वॅक्सिंग करतानाच्या वेदना का सहन करता? घरच्याघरी चिमूटभर हळद वापरुन करा वेदनारहित वॅक्सिंग

फेस वॅक्सिंग करतानाच्या वेदना का सहन करता? घरच्याघरी चिमूटभर हळद वापरुन करा वेदनारहित वॅक्सिंग

प्रत्येक स्त्रीला त्वचा सुंदर ठेवण्याची इच्छा असते. आपली निस्तेज त्वचा असावी असं कोणाला नाही वाटत. त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी, फेस वॅक्सिंग हा एकमेव मार्ग आहे. वॅक्सिंग केस पूर्णपणे काढून टाकते. परंतु यामुळे काही समस्यांचा धोका देखील निर्माण होतो.

आपल्याला जर चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकायचे असतील तर. नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून, घरच्या घरी फेस वॅक्सिंग पॅक हा उपाय करून पाहू शकता. यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. बेसन, हळद आणि पील ऑफ मास्क या साहित्यांचा वापर करून आपण फेस वॅक्सिंग पॅक तयार करू शकता(Turmeric Facial Wax -5 Minute Painless Herbal Wax).

फेस वॅक्सिंग पॅक बनवण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

हळद

पील ऑफ मास्क

फक्त ३ गोष्टी वापरून घरीच करा लिपमास्क, ओठ होतील गुलाबी मऊ सुंदर

अशा प्रकारे बनवा फेस वॅक्सिंग पॅक

सर्वप्रथम, एक बाऊल घ्या. त्या बाऊलमध्ये एक चमचा बेसन, चिमुटभर हळद आणि पील ऑफ मास्क क्रीम घ्या. आता हे मिश्रण चांगले मिक्स करा. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा.

हातावरील मेहेंदीचा रंग गडद होत नाही? ५ चुका टाळा, हातावर चढेल मेहेंदीचा रंग..

हा फेस पॅक काही वेळ तसेच चेहऱ्यावर सुकवण्यासाठी ठेवा. पॅक सुकल्यानंतर अपवर्ड डायरेक्शनने हळू हळू मास्क काढा. यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस, ब्लॅक अँड व्हाईट हेड्स निघून जातील.

व्हिटॅमिन सीचे महागडे फेसपॅक वापरता? त्यापेक्षा पपई खा आणि पपईच्या सालांचा करा फेसपॅक, पाहा इफेक्ट

फेस वॅक्सिंग पॅक झाल्यानंतर हातावर कोरफड जेल आणि गुलाबजल घेऊन चेहऱ्यावर लावा. दोन मिनिटे हाताने चांगले मसाज करा. ज्यामुळे स्किन हायड्रेट आणि ग्लो करेल. उत्तम रिझल्टसाठी ही प्रक्रिया आठवड्यातून दोन वेळा करा. 

Web Title: Turmeric Facial Wax -5 Minute Painless Herbal Wax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.