Lokmat Sakhi >Beauty > 'हळदीच्या बर्फा'चा भन्नाट उपाय, चेहऱ्यावरचे काळे डाग विसरा- त्वचेला मिळेल गोल्डन ग्लो 

'हळदीच्या बर्फा'चा भन्नाट उपाय, चेहऱ्यावरचे काळे डाग विसरा- त्वचेला मिळेल गोल्डन ग्लो 

DIY For Glowing Skin: त्वचेला अधिक फ्रेश लूक देण्यासाठी हा एक खास उपाय करून बघा.. काळवंडलेली त्वचा होईल स्वच्छ आणि त्वचेला मिळेल एक छानसा गोल्डन ग्लो..(to rejuvenate your skin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 01:29 PM2022-07-21T13:29:08+5:302022-07-21T13:29:40+5:30

DIY For Glowing Skin: त्वचेला अधिक फ्रेश लूक देण्यासाठी हा एक खास उपाय करून बघा.. काळवंडलेली त्वचा होईल स्वच्छ आणि त्वचेला मिळेल एक छानसा गोल्डन ग्लो..(to rejuvenate your skin)

Turmeric Ice Cubes: Best home made solution for radiant and bright skin, amazing ice therapy to rejuvenate your skin | 'हळदीच्या बर्फा'चा भन्नाट उपाय, चेहऱ्यावरचे काळे डाग विसरा- त्वचेला मिळेल गोल्डन ग्लो 

'हळदीच्या बर्फा'चा भन्नाट उपाय, चेहऱ्यावरचे काळे डाग विसरा- त्वचेला मिळेल गोल्डन ग्लो 

Highlightsबर्फ आणि हळद या दोन्हींसोबतच इतरही काही पदार्थ एकत्र करून चेहऱ्याला एकदा बर्फाचा मसाज देऊन बघा. गोल्डन फेशियल केल्याप्रमाणे चमकू लागेल त्वचा..

कोणताही ऋतू असो, त्वचेच्या काही ना काही अडचणी असतातच. कधी त्वचा खूपच तेलकट होऊन पिंपल्स (pimples), ब्लॅक हेड्स (black heads), व्हाईट हेड्स (white heads) वाढत जातात तर कधी ऊन, प्रदुषण यामुळे टॅनिंग होऊन त्वचेचा पोत बिघडतो. डोळ्यांभाेवती असणाऱ्या डार्क सर्कल्सचा (dark circles) त्रासही अनेक जणींना वारंवार होतो. त्वचेच्या या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील, तर हा मस्त उपाय (ice cubes for glowing skin) करून बघा. चेहऱ्यासाठी हळदीचा फेसपॅक तुम्ही अनेकदा लावला असणार, बर्फाने चेहऱ्याला मसाज करण्याचे फायदेही आपल्याला माहितीच आहेत. आता बर्फ आणि हळद या दोन्हींसोबतच इतरही काही पदार्थ एकत्र करून चेहऱ्याला एकदा बर्फाचा मसाज देऊन बघा. गोल्डन फेशियल केल्याप्रमाणे चमकू लागेल त्वचा..(perfect solution for radiant and bright skin)

 

हा उपाय करण्यासाठी साहित्य..
१. हळद पावडर एक टीस्पून
२. मुलतानी माती १ टीस्पून
३. गुलाब पाणी १ कप किंवा १५० मिली.
४. नारळाचं दूध १ टीस्पून
५. लेमन इसेंशियल ऑईलचे ५ ते ६ थेंब
६. बर्फाचा ट्रे
- हे सगळं साहित्य एका भांड्यात एकत्र करा आणि त्यानंतर ते थोडं थोडं बर्फाच्या ट्रे मध्ये टाकून फ्रिजरमध्ये काही तासांसाठी सेट करायला ठेवा.
- संत्रीच्या सालांची पावडर जर असेल, तर ती देखील यात टाकू शकता. यामुळे त्वचेवरचे डाग निघून जाण्यास अधिक चांगला फायदा होईल.
- एकदा बनवलेले हे बर्फ तुम्ही २ ते ३ आठवड्यांपर्यंत स्टोअर करून ठेवू शकता. 

 

कसा करायचा हळदीच्या बर्फाचा वापर
- सगळ्यात आधी तर पॅराबिन नसलेल्या सॉफ्ट क्लिन्सरने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
- यानंतर हळदीच्या बर्फाचा एक क्युब घेऊन त्याने चेहऱ्यावर मसाज करा.
- खूप जोरजोरात चोळू नका. हळूवारपणे मसाज करा.
- मसाज झाल्यानंतर १० ते २० मिनिटांसाठी चेहरा तसाच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका.
- चेहरा पुसून कोरडा केल्यानंतर त्वचेला तुमचं नेहमीचं माॅईश्चरायझर किंवा ॲलोव्हेरा जेल लावा. 

 

हळदीचा बर्फ लावण्याचे फायदे
- त्वचेवर चमक येण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे.
- बर्फाने मसाज केल्यामुळे त्वचेमध्ये रक्तप्रवाह अधिक वेगवान होतो. त्यामुळे त्वचा अधिक फ्रेश तजेलदार दिसू लागते. 
- टॅनिंग झालं असेल किंवा पिंपल्सचे काळे डाग असतील, तर ते कमी होण्यास मदत होते.
- त्वचेमधून होणारं तेलाचं सिक्रिशन नियंत्रित ठेवलं जातं. त्यामुळे पिंपल्स, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असा त्रास कमी होतो.


- हळद आणि नारळाचं दूध यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या दिसून येणं कमी होतं. आणि त्वचा तरुण दिसू लागते.
- काही जणींच्या डोळ्यांखालची त्वचा नेहमी सुजलेली baggy eyes दिसते. हा उपाय केल्यास ही समस्याही कमी होऊ शकते.
- त्वचेचा पोत सुधारण्याचा आणि जवळपास त्वचेच्या सगळ्याच समस्या दूर करण्यासाठी हा एक स्वस्तात मस्त उपाय आहे. 

 

Web Title: Turmeric Ice Cubes: Best home made solution for radiant and bright skin, amazing ice therapy to rejuvenate your skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.