Lokmat Sakhi >Beauty > २ चमचे कच्चे दूध- चिमूटभर हळद चेहऱ्याला लावा! महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स,अवघड फेसपॅकपेक्षाही प्रभावी उपाय

२ चमचे कच्चे दूध- चिमूटभर हळद चेहऱ्याला लावा! महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स,अवघड फेसपॅकपेक्षाही प्रभावी उपाय

Turmeric - Milk Face Masks For Glowing Skin कच्चे दूध व हळदीमुळे चेहऱ्यावर ग्लो येतो, व त्वचेच्या समस्या देखील कमी होतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2023 04:37 PM2023-05-15T16:37:04+5:302023-05-15T16:37:54+5:30

Turmeric - Milk Face Masks For Glowing Skin कच्चे दूध व हळदीमुळे चेहऱ्यावर ग्लो येतो, व त्वचेच्या समस्या देखील कमी होतात..

Turmeric - Milk Face Masks For Glowing Skin | २ चमचे कच्चे दूध- चिमूटभर हळद चेहऱ्याला लावा! महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स,अवघड फेसपॅकपेक्षाही प्रभावी उपाय

२ चमचे कच्चे दूध- चिमूटभर हळद चेहऱ्याला लावा! महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स,अवघड फेसपॅकपेक्षाही प्रभावी उपाय

विविध ऋतूनुसार त्वचेच्या समस्या देखील बदलतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोकं विविध उपाय करून पाहतात. काही लोकं महागड्या प्रॉडक्ट्सवर खर्च करतात तर, काही घरगुती उपायांचा वापर करून त्वचेची काळजी घेतात. उन्हाळ्यात धूळ, माती, प्रदूषण यामुळे स्किन लगेच खराब होते. ज्यामुळे चेहऱ्यावर पुरळ, डाग, डेड स्किन अशा विविध समस्या निर्माण होतात.

स्किनची समस्या सोडवण्यासाठी आपण कच्चे दूध व हळदीचा वापर करू शकता. दूध कॅल्शियम आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून आपण कच्च्या दुधाचा वापर करू शकता. हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेच्या संबंधित आजार कमी करण्यासाठी मदत करतात(Turmeric - Milk Face Masks For Glowing Skin).

तेलकट त्वचेपासून सुटका

ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांच्यासाठी हळद व दुधाचा फेसमास्क उत्तम मानला जातो. हळद - दुधाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने तेलकट त्वचेपासून सुटका मिळते. आपल्याला नैसर्गिक पद्धतीने त्वचेतील तेल कमी करायचे असेल तर, हा फेसमास्क महिन्यातून ३ वेळा लावा.

कानाचे छिद्र मोठे झाले, कान ओघळलेत? १ उपाय - कानातले लोंबणार नाहीत..

मुरुमांचे डाग करते कमी

दुधात हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांचे डाग कमी होतात. मुरुमांचे डाग कमी करण्यासाठी आपण दररोज हळदीचे दूध चेहऱ्यावर लावा. हळदीमधील अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म त्वचेवरील मुरुमांचे डाग कमी करण्यास मदत करतात.

पिंपल्सवर घरगुती उपाय

आजकाल लहान मुलांच्या चेहऱ्यावरही पिंपल्स दिसतात. चेहऱ्यावरील मुरुम दूर करण्यासाठी लोक विविध प्रकारचे क्रीम आणि उत्पादने वापरतात. पण रोज दुधात हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांपासून सुटका मिळते.

चमचाभर बेसनाचे ३ फेसपॅक, त्वचा होईल नितळ आणि स्पॉटलेस चमकदार

टॅनिंग दूर करते

दुधात हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंग दूर होते. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर धूळ आणि सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान देखील कमी होते.

नखं अगदीच घाणेरडी दिसतात, सतत तुटतात, पिवळी पडली? खा ५ पदार्थ- नखं होतील सुंदर

ग्लोइंग स्किन

हळदीच्या दुधाचा फेसपॅक त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते. या फेसमास्कचा वापर महिन्यातून निदान ३ वेळा तरी करा.

Web Title: Turmeric - Milk Face Masks For Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.