Join us  

केस फक्त वरून काळे आतून पांढरे झालेत? १ चमचा हळदीची जादू, काळेभोर-दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 8:47 AM

Turmeric Powder For Grey Hair : केसांना काळे करण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकता.

हळदीचे सेवन रोजच्या स्वयंपाकघरात वापरला जातो. यातील औषधी गुण जेवणाची चव वाढवतात. याशिवाय आरोग्यालाही बरेच फायदे मिळतात. इम्यून सिस्टिमही चांगली राहते. स्किनवर ग्लो येतो. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.  (Turmeric Powder For Grey Hair) केसांना काळे करण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात. (Grey Hairs Solution)

तुम्ही ऑलिव्ह ऑईलमध्ये तुम्ही चमचाभर हळद आणि मध मिसळू शकता. यामुळे संपूर्ण  केस काळे होण्यास मदत होईल. १५ ते २० मिनिटं केसांना लावून ठेवा.  त्यानंतर हेअरवॉश करा. यामुळे महिन्याभरात केस काळे होण्यास मदत होईल. (How To Turmeric Can Help Combat Early Frey Hairs)

मास्क लावल्याने  केसांना भरपूर पोषण मिळेल. यामुळे स्काल्प इन्फेक्शनपासून बचाव होतो. यामुळे केसांमध्ये कोंडा उद्भवत नाही.  हळदीतील तत्व केसांना पोषण देतात याशिवाय केसांना चमकही येते.  याशिवाय यातील तत्व केसांसाठी फायदेशीर ठरतात. (How To Get Rid Of Oily Hairs)

ओटी पोट लटकतंय-चरबी कमी होईना? घरी ५ मिनिटांचा हा व्यायाम करा, महिन्याभरात स्लिम व्हाल

हळदीतील पोषक तत्व

हळदीत प्रोटीन्स, कार्बोहायड्रर्टेस, कॅल्शियम, फायबर्स, आयर्न, कॉपर, जिंक फॉस्फरेस असते. याव्यतिरिक्त व्हिटामीन बी-६, व्हिटामीन सी, व्हिटामीन ई, व्हिटामीन के असते. यातील पोषक तत्व केसांच्या समस्येपासून आराम देतात.

दात पिवळे, चिकट झालेत? १ चुटकी मिठात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र दिसतील दात

नारळ तेलात हा हेअर पॅक लावल्यास केसांची वाढ चांगली होते. एका वाटीत नारळाचे तेल घेऊन गरम करा. तेलात हळद  घाला. तेल हलकं गरम झाल्यानंतर तुम्ही केसांना लावू शकता. तेलाची चंपी करा. २० ते २५ मिनिटं केसांना लावून ठेवा. 

हळदीचा स्प्रे

केसांना काळे बनवण्यासाठी तसंच चमकदार बनवण्यासाठी हळदीचा वापर करू शकता. हळदीचा स्प्रे बनवण्यासाठी हळदीची पावडर पाण्यात मिसळा.  त्यात एलोवेरा जेल मिसळून घाला. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून व्यवस्थित केसांच्या मुळांना लावा. यामुळे केसांची वाढ चांगली होईल.

एक ते दीड तासाने केस स्वच्छ धुवून टाका.  केस दाट आणि शायनी होण्यास मदत होईल. याशिवाय ऑलिव्ह ऑईल आणि हळद मिसळा. हा हेअर मास्क १५ ते २० मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्या.  हळदीचा मास्क  हळूहळू केसांच्या मुळांपासून लांबीपर्यंत लावा. ज्यामुळे  केसांना काळे होण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी