Lokmat Sakhi >Beauty > कांद्याच्या सालीपासून घरीच बनवा डाय; पांढरे केस होतील नैसर्गिकरित्या काळेभोर, दाट

कांद्याच्या सालीपासून घरीच बनवा डाय; पांढरे केस होतील नैसर्गिकरित्या काळेभोर, दाट

White Hair Naturally Black : केस काळे करण्यासाठी तुम्ही कांद्याच्या सालीचा वापर करू शकता.  कांद्याची साल केसांना मुळापासून काळे बनवते आणि पोषण देते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 03:31 PM2023-01-22T15:31:29+5:302023-01-22T15:55:30+5:30

White Hair Naturally Black : केस काळे करण्यासाठी तुम्ही कांद्याच्या सालीचा वापर करू शकता.  कांद्याची साल केसांना मुळापासून काळे बनवते आणि पोषण देते.

Turn white hair naturally black using just onion peel; Hair will look dark | कांद्याच्या सालीपासून घरीच बनवा डाय; पांढरे केस होतील नैसर्गिकरित्या काळेभोर, दाट

कांद्याच्या सालीपासून घरीच बनवा डाय; पांढरे केस होतील नैसर्गिकरित्या काळेभोर, दाट

केस पांढरे होणं ही समस्या आजकाल खूपच कॉमन झालीये. केसांची निगा  कठीण झालंय. केस खूप गळतात तर कधी अकाली पांढरे होतात. केस काळे करण्यासाठी तुम्ही डाय, हेअर कलर वापरण्याला घाबरत असाल तर काही घरगुती उपाय तुम्हाला उपयोग ठरू शकतात. (Hair Care Tips)

केस काळे करण्यासाठी तुम्ही कांद्याच्या सालीचा वापर करू शकता.  कांद्याची साल केसांना मुळापासून काळे बनवते आणि पोषण देते. कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी केला जातो हे तुम्ही ऐकून असाल पण कांद्याच्या सालीसुद्धा कांद्या इतक्याच फायदेशीर असतात. (How to get dark black hairs) 

कांदयाच्या सालीशिवाय कांद्याचा रस केसांसाठी खूप आरोग्यदायी असू शकतो. याच्या मदतीने तुम्ही केस गळण्याची समस्या दूर करू शकता तसेच केसांची वाढ सुधारू शकता. कांद्यामध्ये असलेले सल्फर केस दाट करण्यासाठी प्रभावी आहे.

केस जाड आणि घट्ट होण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस अनेक प्रकारे केसांना लावू शकता.  पातळ केस जाड करण्यासाठी कांद्याचे छोटे तुकडे करून खोबरेल तेलात टाका. आता हे तेल चांगले उकळून मंद आचेवर रंग बदलेपर्यंत शिजवा. यानंतर हे तेल थंड होऊ द्या. आता हे तेल केसांना लावून मसाज करा.
 

Web Title: Turn white hair naturally black using just onion peel; Hair will look dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.