कमी वयात केस पांढरे होणे ही गेल्या काही वर्षातील अतिशय सामान्य समस्या आहे. केस पांढरे झाल्यामुळे हैराण झालेले बरेच जण आपल्या आजुबाजूला दिसतात. एकदा केस पांढरे झाले की त्यांना कलर करणे हा एकच उपाय आपल्याकडे राहतो. कलर केल्याने पांढऱ्या केसांची संख्या वाढत जाते आणि मग सतत मेहंदी लावणे किंवा डाय करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. केस पांढरे होण्यामागे ताणतणाव, अनुवंशिकता, शरीरात काही घटकांची कमतरता असणे अशी बरीच कारणे असू शकतात (Turn White Hairs Into Black With Help Of Ayurveda).
आयुर्वेदात असे काही उपाय आहेत ज्यामुळे काही ना काही कारणाने पांढरे होत असलेले केस पांढरे होणे कमी होते आणि ते पुन्हा काळे होऊ शकतात. आयुर्वेदाचे अभ्यासक नित्यानंद श्री एका व्हिडिओच्या माध्यमातून याविषयी माहीती देतात. त्वचा, केस आणि रोग्याच्या बहुतांश समस्या या आपल्या आहाराशी निगडीत असतात, त्यामुळे आहारात काही बदल केल्यास त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो. पाहूया आहाराच्या बाबतीत नेमके कोणते बदल केल्यास केस काळे होण्यास फायदा होतो.
केस काळे होण्यासाठी घरगुती उपाय...
१. केस काळे करण्यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात थोडे बदाम तेल घाला. बदामाचे तेल उपलब्ध नसेल तर तिळाचे तेल घातले तरी चालेल. यामध्ये कोरफडीचा गर आणि एक चमचा मध मिसळून तयार केलेल्या पेस्टने केसांना मसाज करा. ही पेस्ट केसांना पोषण देते आणि केसांचा कोंडा दूर करते. या उपायांचा अवलंब करून तुम्हीही केस काळे करू शकता.
२. केस काळे करण्यासाठी आहारात आवळ्याचे सेवन करणे अतिशय उपयुक्त ठरते. आवळा चटणीच्या स्वरूपात किंवा कच्च्या स्वरूपात सेवन केल्याने शरीराला फायदा होतो.
३. केसांसाठी रोज एक ते दोन चमचे तूप आहारात असायलाच हवे. केसांसोबतच आरोग्यालाही तूप खाण्याचा फायदा होतो. तुपाच्या सेवनाने केस काळे होतात.
४. आहारात आवळा घेण्याबरोबरच आवळ्याचे तेलही केस काळे करण्यासाठी उपयुक्त ठरते.
५. आयुर्वेदिक शाम्पूचा वापर केल्यास केस नैसर्गिकरित्या काळे होऊ शकतात. हा शॅम्पू तुम्ही घरी तयार करू शकता. हा शाम्पू बनवण्यासाठी आवळा आणि रीठा एका कढईत भिजवा आणि सकाळी शाम्पूप्रमाणे केसांना लावा.