क्लासिक अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आपल्या अदाकारी आणि मिश्कील स्वभावासाठी ओळखली जाते. पन्नाशी गाठत आलेली ही अभिनेत्री आजही तितकीच तरुण आणि सुंदर दिसते. तिने चित्रपटसृष्टीला रामराम जरी ठोकला असला तरी ती, कायम सोशल मीडियात चर्चेत असते. तिची त्वचा कायम ग्लो आणि केस (Hair care) शाईन करतात. पण तिच्या घनदाट-शाईनी केसांमागे रहस्य काय? याची माहिती तिने खुद्द सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे.
हेअर केअरसाठी ती घरगुती साहित्यांचा वापर करते. मुख्य म्हणजे मेथी दाणे (Fenugreek Seeds) आणि कांद्याच्या (Onion) वापरामुळे तिचे केस शाईन करत असल्याचं ती सांगते. ट्विंकल खन्नासारखे तुम्हालाही घनदाट, शाईनी, बाउंसी केस हवे असतील, केसांवर मेथी दाणे - कांद्याचा हेअरमास्क लावा(Twinkle Khanna's 2-ingredient DIY hair mask is all things edible).
मेथी दाणे-कांद्याचा हेअर मास्क करण्यासाठी लागणारं साहित्य
मेथी दाणे
मान-चेहरा-पाठीवरील चामखीळामुळे हैराण झालात? ४ घरगुती सोपे उपाय, काही दिवसात-न दुखवता निघेल चामखीळ
कांदा
पाणी
हेअरमास्क करण्याची योग्य पद्धत
सर्वप्रथम, रात्रभर २ चमचे मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा. नंतर मिक्सरच्या भांड्यात २ चमचे भिजलेले मेथी दाणे, एक चिरलेला कांदा व थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. केस विंचरून घ्या, तयार पेस्ट केसांवर लावा. ३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. आठवड्यातून एक वेळा या हेअरमास्कचा वापर केल्याने काही दिवसात केस गळणे, केसात कोंडा, केस अकाली पांढरे होण्याची समस्या सुटेल. शिवाय केस बाउंसी आणि शाईन करतील.
केसांसाठी मेथी दाण्याचे फायदे
केसांसाठी खास मेथी दाण्यांचा वापर केला जातो. मेथी दाण्यात सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह व्हिटॅमिन डी-सी आढळते. जे केसांसाठी उपयुक्त ठरते. केसांसाठी मेथी दाण्याचा वापर केल्याने केस घनदाट होतात. शिवाय इतर समस्याही सुटतात.
२ कप ज्वारीचा करा कुरकुरीत पौष्टीक डोसा, ग्लुटेन फ्री रेसिपी वेट लॉससाठी उत्तम-चवीला जबरदस्त
केसांसाठी कांद्याचे फायदे
केस निरोगी आणि मजबूत होण्यासाठी बरेच जण कांद्याचा वापर करतात. आयुर्वेदानुसार, कांद्याच्या रसामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात. जे केसांना सखोल पोषण देतात. शिवाय त्यात सल्फर असते, जे केसांसाठी फायदेशीर ठरते. केसांसाठी कांद्याचा वापर केल्याने केस गळणे, कोंडा, पांढरे होणे यासह इतर केसांच्या संबंधित समस्या सुटतात.