Lokmat Sakhi >Beauty > कितीही तेल लावा-शाम्पू बदला केस गळणं थांबत नाही? डॉक्टर विचारतात, तुम्ही पाणी किती पिता..

कितीही तेल लावा-शाम्पू बदला केस गळणं थांबत नाही? डॉक्टर विचारतात, तुम्ही पाणी किती पिता..

Understand how dehydration affects your Hair पाणी पिण्याचा आणि केस गळण्याचा काय संबंध? डॉक्टर सांगतात पाणी कमी पीत असाल तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2023 01:44 PM2023-09-08T13:44:17+5:302023-09-08T13:45:08+5:30

Understand how dehydration affects your Hair पाणी पिण्याचा आणि केस गळण्याचा काय संबंध? डॉक्टर सांगतात पाणी कमी पीत असाल तर?

Understand how dehydration affects your Hair | कितीही तेल लावा-शाम्पू बदला केस गळणं थांबत नाही? डॉक्टर विचारतात, तुम्ही पाणी किती पिता..

कितीही तेल लावा-शाम्पू बदला केस गळणं थांबत नाही? डॉक्टर विचारतात, तुम्ही पाणी किती पिता..

तुमचेही केस वारंवार गळतात? तेल आणि शाम्पूचा वापर करूनही केस गळती थांबत नाही? केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? जर या समस्येपासून आपणही त्रस्त असाल तर, आपल्या डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला अनेकांना जमेलच असे नाही. प्रदूषण, धूळ, माती या कारणांमुळे केसांना हानी पोहचतेच. यासह शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही केस गळतीची समस्या वाढू शकते.

यासंदर्भात, चीफ डर्मेटोलॉजिस्ट डॉ मोनिका चाहर सांगतात, 'शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे तुमचे केस निर्जीव, खडबडीत आणि हेअर फॉल होऊ शकते.' परंतु, पाण्याचा आणि केस गळण्याचा संबंध काय? शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे खरंच केस गळती होऊ शकते का? पाहूयात(Understand how dehydration affects your Hair).

डिहायड्रेशनमुळे खरंच हेअर फॉल होऊ शकते का?

डर्मेटोलॉजिस्ट सांगतात, 'डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्य, त्वचा आणि केसांवरही होतो. जर आपले शरीर हायड्रेट राहिले तर, नक्कीच अनेक आजार बरे होतील. परंतु, डिहायड्रेशनमुळे हेअर फॉल होऊ शकते.'

शरीराला घामामुळे दुर्गंध येतो? आंघोळीच्या पाण्यात मिसळा ५ रुपयांची पांढरी गोष्ट - दिवसभर राहाल फ्रेश

ते पुढे सांगतात, 'जेव्हा शरीर हायड्रेट असते, तेव्हा केसांमध्ये आर्द्रता टिकून राहते. केसांच्या वाढीसाठी आर्द्रता खूप महत्त्वाची आहे. जर आपण वेळेवर योग्यप्रमाणात पाणी पीत नसाल तर, तर केस निस्तेज, कोरडे, आणि हेअर फॉल होते.  डिहायड्रेशनचा थेट परिणाम स्काल्पवर होतो. स्काल्प कोरडी, फ्लॅकी आणि खाज सुटण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे केस वाढीवर परिणाम होते. अशावेळी नवीन केस निर्माण करण्याचीही क्षमता नष्ट होऊ शकते.'

स्ट्रेस वाढते

डिहायड्रेशनमुळे शरीरातील तणावाची पातळी वाढू शकते. सततच्या डिहायड्रेशनमुळे कोर्टिसोल सारख्या तणाव संप्रेरकांच्या पातळीत वाढ होते. वाढलेल्या तणावामुळे केसांच्या नैसर्गिक वाढीच्या चक्रात व्यत्यय येऊ शकते.

अशा वेळी केसांची काळजी कशी घ्याल

- डिहायड्रेशन टाळण्यासाठी दररोज १० ग्लास पाणी प्या.

- पाणी पिण्यासाठी रिमाइन्डर लावा. बाहेर कुठे गेल्यास पाण्याची बाटली सोबत ठेवा.

- जर आपल्याला साधे पाणी पिणे आवडत नसेल तर, ताज्या फळांचा रस प्या.

- तहान लागत नसली तरी दर तासाला पाणी पिणे गरजेचं आहे.

मेथी दाणे-अळशी आणि भोपळ्याच्या बिया, केसांच्या सर्व समस्यांवर १ उत्तम उपाय-पाहा करुन

- जर आपण हायड्रेट राहाल तर, याचा फायदा फक्त केसांना नसून, संपूर्ण आरोग्याला होऊ शकते.

निरोगी केसांसाठी आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने समृद्ध संतुलित आहार घेणं महत्वाचे आहे. जर आपले केस खूप गळत असतील तर, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Web Title: Understand how dehydration affects your Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.