निरोगी राहण्यासाठी आंघोळ करणे खूप गरजेचं आहे (Salt Water). नियमित आंघोळ केल्याने शरीरातील दुर्गंधी दूर होते. ज्यामुळे संसर्गाचा धोका राहत नाही. अंघोळ करण्यासाठी आपण साधारण साबण किंवा शाम्पूचा वापर करतो (Bath Benefits). यामुळे त्वचा स्वच्छ होते. या व्यतिरिक्त आपण मिठाचा देखील वापर करू शकता.
अनेकजण पाण्यात मीठ घालून आंघोळ करतात. यामुळे ताजेपणा सोबतच आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. यासाठी आपण एप्सम मीठ वापरू शकता. एप्सम मीठ, ज्याला मॅग्नेशियम सल्फेट देखील म्हणतात(Understand the Benefits of Taking a Warm Saltwater Bath).
सापांची भीती वाटते, घराजवळ साप निघतात? घरात लावा ४ रोपं; साप- किडे फिरकणार नाहीत..
एप्सम सॉल्टमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते, जे स्नायूंचा थकवा आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. जेव्हा आपण एप्सम मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतून मॅग्नेशियम शोषले जाते आणि स्नायूंमध्ये जमा झालेले लॅक्टिक ऍसिड आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे स्नायूंना आराम मिळतो.
तणाव आणि थकव्यापासून आराम
एप्सम सॉल्ट केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मॅग्नेशियम स्ट्रेस हार्मोन्सवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. ज्यामुळे मनाला शांती मिळते.
त्वचेच्या समस्या होतील दूर
एप्सम सॉल्टमधील दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेच्या समस्या दूर करण्यात मदत करतात. ते तुमची त्वचा एक्सफोलिएट करते आणि मृत पेशी काढून टाकते. यामुळे त्वचा चमकदार होते.
मुलं ऐकत नाहीत म्हणून सतत ओरडता? ३ टिप्स; मुलं ऐकतील - स्वतःमध्ये बदलही करतील
वेदनेपासून आराम
एप्सम सॉल्टने आंघोळ केल्याने वेदनेपासून आराम मिळतो. जर अंगदुखी आणि गुडघेदुखीने त्रस्त असाल तर, मिठाच्या पाण्याने आंघोळ करा.