Join us  

अर्धा चमचा कॉफी - १ चमचा कोरफडीचा गर! फक्त एवढंच लावा, थकलेला चेहरा दिसेल काही मिनिटात फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 12:17 PM

Unknown benefits of coffee in skincare पार्लरमध्ये जायला वेळ नाही, अर्धा चमचा कॉफीने बनवा फेसमास्क, दिसाल ब्युटीफुल..

काही लोकांची दिवसाची सुरुवात कॉफीने होते. कॉफीशिवाय अनेकांना काम करण्यास उर्जा मिळत नाही. कॉफीचे अनेक पदार्थ बनवले जातात. शहरी भागात कॉफीचा जास्त वापर होतो. कॉफी जसं पेय म्हणून प्यायले जाते, त्याचप्रमाणे कॉफीचा वापर चेहऱ्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरतो.

तेलकट ते कोरड्या त्वचेसाठी कॉफी खूप उपयोगी असते. कॉफीचा वापर स्क्रब व फेसपॅक बनवण्यासाठी होतो. कॉफीमुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण नियंत्रित राहते. चेहऱ्यावर असणारी छिद्रे भरुन निघतात. आपण कॉफीचा वापर करून फेसमास्क बनवू शकता. यामुळे उन्हाळ्यातील त्वचेच्या निगडीत समस्या कमी होईल. व चेहरा तजेलदार दिसेल(Unknown benefits of coffee in skincare).

कॉफी आणि एलोवेरा जेलचा करा असा वापर

कॉफी आणि एलोवेराचा वापर चेहऱ्यावरील समस्या सोडवण्यासाठी होतो. चेहऱ्यासाठी अनेक जण एलोवेरा आणि कॉफीचा वापर करतात. यासाठी अर्धा चमचा कॉफी पावडर, एक चमचा एलोवेरा जेल, आणि चिमुटभर हळदीची आवशक्यता आहे.

उन्हाळ्यात मांडी घासली जाऊन जखमा झाल्या? धड चालता येत नाही? ४ उपाय- घामाचा त्रास होईल कमी

सर्वप्रथम, एक वाटी घ्या, त्यात अर्धा चमचा कॉफी पावडर, एक चमचा एलोवेरा जेल, आणि चिमुटभर हळद घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा सामान्य पाण्याने स्वच्छ धुवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. व हलक्या हाताने ५ मिनिटांसाठी मसाज करा. १० ते १५ मिनिटानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा. आपण या फेसमास्कचा वापर महिन्यातून ३ वेळा करू शकता. याने चेहरा साफ होईल, व ग्लो करेल.

कॉफी, एलोवेरा, व हळदीचे फायदे

कॉफीमध्ये कॅफीक ऍसिड असते. जे त्वचेला ऑक्सिजन आणि ब्लड सर्क्युलेशन सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्याचे अँटी-मायक्रोबियल गुणधर्म त्वचेचे जंतूपासून संरक्षण करतात. ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते.

एलोवेरा जेलमध्ये थंड गुणधर्म आणि अँटी-इंफ्लामेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेमध्ये आद्रता कायम राहते. व त्वचेचे छिद्र घट्ट होण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा तरुण आणि घट्ट दिसते.

रात्री होतील त्वचेच्या समस्या छूमंतर, खोबरेल तेलाचा करा खास वापर, स्किन चमकेल

सौंदर्य खुलवण्यासाठी हळदीचा वापर होतो. आरोग्य आणि त्वचेसाठी हळद उपयुक्त ठरते. उन्हाळ्यातील टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी