अभिनेत्री उर्फी जावेद. सोशल मिडीयावर आपल्या हटके ड्रेसिंग स्टाईलमुळे कायम चर्चेत असते (Uorfi Javed). कधी पिझ्झा तर कधी गोणीचा ड्रेस घालून पापाराझींसमोर येते. ज्याप्रमाणे ती तिच्या हटके ड्रेसिंगसाठी ओळखली जाते. त्याचप्रमाणे तिची स्किन रुटीनही तितकीच व्हायरल होते (Beauty Tips). त्वचा ग्लोईंग,सुंदर दिसावी असं कोणाला वाटत नाही. पण उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा हमखास टॅन होते.
त्वचेचं टॅनिंग घालवण्यासाठी आपण ब्यूटी पार्लरला जातो. जिथे जाऊन खर्च होतो तो वेगळाच. जर आपल्याला उन्हाळ्यातही ग्लोईंग त्वचा हवी असेल तर, उर्फी जावेदच्या व्हायरल फेसमास्कचा वापर करा. या फेसमास्कमुळे त्वचा तर ग्लो करेलच, शिवाय टॅन, स्किन डागरहित दिसेल(Urfi Javed shares DIY face mask secret for her glowing Skin).
उर्फी जावेदसारखी तुकतुकीत स्किन हवी? मग हा फेसमास्क वापरून पाहाच..
लागणारं साहित्य
ना पेस्ट - ना खर्च, १ रुपयाच्या शाम्पूने करा पेडीक्युअर, पायाचा काळेपणा होईल दूर; दिसतील स्वच्छ
तांदुळाचं पाणी
मुलतानी माती
मध
लिंबाचा रस
कॉफी
टोमॅटोचा रस
अशा पद्धतीने तयार करा फेसमास्क
उर्फी जावेद स्पेशल फेसमास्क तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये ४ चमचे तांदुळाचं पाणी घ्या. त्यात २ चमचे मुलतानी माती, अर्धा चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा कॉफी आणि टोमॅटोचा रस घालून मिक्स करा. अशा प्रकारे उर्फी जावेद स्पेशल फेस मास्क वापरण्यासाठी रेडी.
अशा पद्धतीने चेहऱ्यावर लावा फेसमास्क
सर्वप्रथम, चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर हाताने किंवा बोटाने तयार पेस्ट घेऊन चेहऱ्यावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर किंवा १५ मिनिटानंतर पाण्याने चेहरा धुवा. नंतर चेहऱ्यावर काहीच लावू नका. आपण या फेस मास्कचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे स्किन नक्कीच ग्लो करेल. टॅनिंग दूर होईल. शिवाय चेहरा डागरहित दिसेल.
चेहऱ्यावर तांदुळाचे पाणी लावण्याचे फायदे
- चेहऱ्यासाठी तांदुळाचे पाणी म्हणजे वरदान. तांदुळाचे पाणी जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. या पाण्यामुळे त्वचा उजळ होते. शिवाय मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते.
चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याचे फायदे
मान-पाय-चेहराही काळवंडलाय? कोमट पाण्यात मिसळा ५ गोष्टी; एकदा वापरून दिसेल फरक
- मुलतानी माती ही एक प्रकारची माती आहे जी ॲल्युमिनियम मॅग्नेशियम सिलिकेटने समृद्ध आहे. या मातीचे कण अतिशय बारीक असतात. शिवाय या मातीमध्ये अनेक हर्बल गुणधर्म आहेत. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. मुख्य म्हणजे चेहऱ्यावर ही माती लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. आणि मुरुमांचे डागही दूर होतात.