Lokmat Sakhi >Beauty > Urvashi rautela mud bath : काही सेकंदांच्या मड बाथसाठी उर्वशीनं मोजले २० हजार; हा प्रकार आहे तरी काय? जाणून घ्या

Urvashi rautela mud bath : काही सेकंदांच्या मड बाथसाठी उर्वशीनं मोजले २० हजार; हा प्रकार आहे तरी काय? जाणून घ्या

Urvashi rautela takes mud bath : सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचा मड बाथ घेतानाचा फोटो व्हायरल होत आहे. आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 03:46 PM2021-06-16T15:46:06+5:302021-06-16T17:17:53+5:30

Urvashi rautela takes mud bath : सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचा मड बाथ घेतानाचा फोटो व्हायरल होत आहे. आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते.

Urvashi rautela takes mud bath : Urvashi rautela takes mud bath for glowing skin know its benefits | Urvashi rautela mud bath : काही सेकंदांच्या मड बाथसाठी उर्वशीनं मोजले २० हजार; हा प्रकार आहे तरी काय? जाणून घ्या

Urvashi rautela mud bath : काही सेकंदांच्या मड बाथसाठी उर्वशीनं मोजले २० हजार; हा प्रकार आहे तरी काय? जाणून घ्या

सुंदर दिसण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी काहीही करण्याची तयारी प्रत्येक सेलिब्रेटीची असते. अनेकदा सेलिब्रेटींच्या फिटनेस आणि मेकअपचे फंडे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर काहीवेळा अभिनेत्रींना त्यांच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचा मड बाथ घेतानाचा फोटो व्हायरल होत आहे. आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते. नेहमीच उर्वशी तिच्या महागड्या फॅशनमुळे चर्चेत असते. ड्रेसिंग स्टाईलसह शूज, बॅग, गॉगल यामध्येही विविध प्रकारचे नवनवे ब्रँड्स तिच्याकडे पाहायला मिळतात.

अधिकाधिक लक्षवेधी ठरावी यासाठी कितीही पैसा लागला तरी उर्वशीची खर्च करण्याची तयारी असते. मड स्पासाठी देखील उर्वशीला मोठी किंमत मोजावी लागली आहे. काही मिनिटांसाठीच्या या मड स्पासाठी तिनं २० हजार रुपये मोजले आहेत. कदाचित मड बाथ हा शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल. मड बाथ मध्ये खरंच चिखलात अंघोळ करतात का? या बाथमुळे त्वचेला काय फायदे होतात. याबाबत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. केतकी गोगटे यांनी अधिक माहिती दिली आहे. 

डॉ. केतकी सांगतात की, ''हॉट स्प्रिंग्समधले पाणी आणि वॉल्केनिक अॅश  (Volcanic ash) ज्या ठिकाणी एकत्र येते. तिथे नैसर्गिक मड बाथ घेणं फायद्याचे ठरते. जगभरात साधारण दोन ते तीन ठिकाणी असा नैसर्गिक मड बाथ घेता येऊ शकतो. इतर ठिकाणाहून किंवा ऑनलाईन साईड्द्वारे मिळणारे मड बाथचे साहित्य वास्तविक पाहता अचूक, प्रभावी असेलच असं नाही. मड बाथ त्वचेसाठी फायदेशीर ठरत असून एक्झिमा, सोसायसीस यांसारख्या त्वचा रोगांची तीव्रता कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरते.''

मड बाथचे फायदे

मड बाथ त्वचेसाठी अनेकदृष्या फायदेशीर ठरते. उन्हाळ्याच्या मौसमात मड बाथचा वापर त्वचेला थंडवा करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.  मड बाथ एखाद्या एंटी एजिंगप्रमाणे काम करते. त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मडचा वापर केला जातो.  यामुळे त्वचेवरील फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 

डागविरहित आणि मऊ त्वचा सगळ्यांनाच हवी असते. शरीरात उष्णता वाढल्यानं त्वचेवर पिंपल्स येतात. अशा स्थितीत मड थेरेपी  तोंडावरील काळपटपणा,  डाग कमी करण्यास मदत करते. या थेरेपीमुळे तोंडावर नैसर्गिक चमक येते. 

उर्वशीनं आपला मड बाथचा फोटो शेअर करत फायदेही सांगितले आहेत. या मड बाथमुळे त्वचेतील अशुद्धता निघून त्वचा स्वच्छ आणि निरोगी होते. रक्ताभिसरण वाढल्याने त्वचा मऊ होत असल्याचं उर्वशी तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. याशिवाय शरीरातील थकवा कमी होतो असंही तिच्या पोस्टमध्ये नमुद केलंय.

Web Title: Urvashi rautela takes mud bath : Urvashi rautela takes mud bath for glowing skin know its benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.