Join us  

दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी अंघोळ करताना '५' गोष्टींचा करा वापर..परफ्यूमचीही भासणार नाही गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2022 8:22 PM

Home Bath Home Remedy शरीरातून दुर्गंधी येते, फ्रेश नाही वाटत, अंघोळ करताना 'या' घरगुती उपायांचा करा वापर, वाटेल फ्रेश

आपल्या शरीरासाठी स्वच्छ्ता खूप महत्त्वाची आहे. मानसिक स्वच्छते बरोबरच शारीरिक स्वच्छता ही आवश्यक आहे. आंघोळ नियमित केल्याने शरीर स्वच्छ आणि ताजे राहते आणि आजार देखील दूर राहतात. मात्र, काही वेळा आंघोळ केल्यानंतरही फ्रेश वाटत नाही. शरीरावर अंघोळ करून परफ्यूम मारल्यानंतर देखील कालांतराने दुर्गंधी येऊ लागते. काहींना फ्रेश देखील वाटत नाही. फ्रेश वाटावं यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. मात्र, आज आपण दिवसभर फ्रेश वाटावे यासाठी एक घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय नियमित केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटेल आणि परफ्युमची गरज देखील भासणार नाही.

तुरटी

तुरटीचे अनेक फायदे आहेत. तुरटीमधील गुणधर्म केवळ नैसर्गिकरीत्या अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक नाही तर आपल्या शरीराला ताजे ठेवण्यासाठी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. अंघोळ करण्यापूर्वी पाण्यात तुरटीचे थोडे खडे टाका आणि पाण्यात मिसळा. तुरटी मिसळलेल्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीर ताजेतवाने होते आणि शरीरातून दुर्गंधीही येत नाही.

लिंबाचा रस

लिंबू आम्लयुक्त आहे, त्यामुळे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी ते खूप प्रभावी आहे. अंघोळ करण्यापूर्वी पाण्यात लिंबाचा रस घाला. यामुळे शरीरातील दुर्गंधी दूर होईल. यासोबतच डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठीही लिंबू उपयुक्त आहे. लिंबुमुळे दिवसभर फ्रेश देखील वाटेल.

चंदन तेल

पाण्यात चंदनाचे तेल मिसळून आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीराची दुर्गंधी तर दूर होतेच पण त्वचेची मॉइश्चरायझर लेव्हलही कायम राहते. नियमित चंदन तेल पाण्यात मिसळून अंघोळ केल्याने त्वचा नेहमी कोमल राहेल.

फुले

प्रत्येकाला सुगंधी फुले आवडतात. आंघोळीच्या पाण्यात मोगरा किंवा गुलाबाची फुले मिसळून आंघोळ करू शकता. यामुळे शरीरातून दुर्गंधी येणार नाही आणि दिवसभर ताजेतवाने वाटेल. तसेच आंघोळीनंतर परफ्यूमची गरज भासणार नाही.

कडुलिंबाची पाने

कडुलिंब हे नैसर्गिकरित्या खूप फायदेशीर आहे. कडुलिंबाची पाने अनेक जणं पाण्यात टाकून अंघोळ करतात. कडुलिंबाची पाने पाण्यात मिसळून अंघोळ केल्याने शरीर ताजेतवाने राहते. सर्वप्रथम 10 ते 15 कडुलिंबाची पाने उकळा, नंतर ती आंघोळीच्या पाण्यात मिसळा आणि आंघोळ करा. फ्रेशसह दिवसभरात शरीरातून दुर्गंधी देखील येणार नाही.

टॅग्स :होम रेमेडीलाइफस्टाइल