Join us  

रोजच्या या ५ कामांसाठी वापरा बेबी प्रोडक्टस; समजून घ्या कसा वापर करायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 4:20 PM

Baby Products for Adult बाळासारखी मुलायम त्वचा मिळवायची असेल, तर बेबी प्रोडक्टचा वापर हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

सॉफ्ट आणि ग्लोईंग स्कीनसाठी बरेच जण महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. काहींना ते प्रोडक्ट्स सूट करतात तर काहींच्या चेहऱ्यावर दुष्परिणाम ठरतात. प्रत्येक वयोगटानुसार विविध प्रोडक्ट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. वाढत्या वयानुसार स्कीनमध्ये देखील बदलाव जाणवतो. मात्र, असे देखील काही प्रोडक्ट्स आहेत जे लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी समान काम करतात. हे प्रोडक्ट्स स्कीन ऐवजी इतर समस्येपासून आराम देतात.

बेबी वाईप्स

द हेल्‍दी डॉट कॉमच्या मते, बाळांची कोमल त्वचा साफ करण्यासाठी आपण बेबी वाईप्सचा वापर करतो. बेबी वाइप्समध्ये केमिकलचे प्रमाण कमी असते, ज्याचा वापर महिला मेकअप काढण्यासाठीही करू शकतात. याशिवाय शूज स्वच्छ करण्यासाठी बेबी वाइप्सचाही वापर केला जाऊ शकतो. यामुळे शूजला चांगली चमक येईल.

सनस्क्रीन

लहान मुलांसाठी वापरण्यात येणारे सनस्क्रीन लोशन प्रौढांसाठीही उपयुक्त ठरू शकते. बाळाच्या सनस्क्रीनमध्ये केमिकलचे प्रमाण कमी असते ज्यामुळे मोठ्यांच्या त्वचेला इजा होत नाही. याशिवाय दररोज सनस्क्रीन वापरल्याने त्वचेला टॅनिंगपासून वाचवता येते.

बेबी पावडर

उन्हाळ्यात बेबी पावडर जास्त फायदेशीर ठरते. घाम आणि उष्णतेपासून बचाव करते. अनेक वेळा मांड्यांना इजा होते, त्याजागी बेबी पावडर लावल्याने मांड्या कोरडे राहतात. त्याचे कोणतेही दुष्परिणामही होत नाहीत.

निप्पल बाम

नर्सिंग मातांना ओवर द काउंटरवर निप्पल बाम लावण्याचा सल्ला दिला जातो. हे निपल बाम केवळ स्तनाग्रच नव्हे तर कोरडे, फाटलेले ओठ आणि खडबडीत टाच यासह कोपर देखील मऊ ठेवण्यास मदत करतात.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्स