त्वचेची हानी न होता त्वचा स्वच्छ होण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचा साबण आंघोळीसाठी वापरला जातो. तसेच आंघोळीसाठीचे साबण सतत बदलत असतात. साबण कितीही चांगला असला तरी त्यातील रासायनिक घटक त्वचेवर परिणाम करतात. या रासायनिक घटकांमुळे त्वचेची हानीही होते, पण ती साबणानं होते हे मात्र लक्षात येत नाही. त्वचेची हानी टाळून त्वचा स्वच्छ होणं महत्वाचं. यासाठी बाजारात मिळणारे केमिकल्सयुक्त साबण नाही तर बाथ पावडर (bath powder) वापरणं गरजेचं. ही बाथ पावडर म्हणजे नैसर्गिक ड्राय स्क्रब वाॅश असून ती घरच्याघरी ( homemade bath powder) सहज तयार करता येते. आंघोळीला घरी तयार केलेल्या बाथ पावडरचा वापर केल्यास (benefits of using bath powder) त्वचेचा नाजूक पोत सांभाळला जातो आणि त्वचेची खोलवर स्वच्छताही होते.
Image: Google
बाथ पावडर घरी तयार करण्यासाठी
घरच्याघरी बाथ पावडर तयार करण्यासाठी 2 कप सालीची मुगाची डाळ, 1 कप बेसन, 1 कप तांदूळ, 2 कप मसुराची डाळ, 1 मोठा चमचा चंदनाची पावडर, 1 चमचा सेंद्रिय हळद घ्यावी. बाथ पावडर तयार करताना सालीची मुगाची डाळ आणि मसूर डाळ एकत्र मिक्सरमधून वाटून घ्यावी. तांदळाचं पीठ करुन घ्यावं. एका वाटीमध्ये सर्व प्रकारचे पीठ एकत्र करावेत. त्यात थोडी हळद मिसळून घ्यावी. आंघोळीच्या वेळेस जेवढी लागेल तेवढी बाथ पावडर घ्यावी. त्यात थोडं पाणी मिसळून घ्यावं. आंघोळ करताना अंगं ओलं करुन बाथ पावडर लावून हळूवार हातानं मसाज करावा.
Image: Google
बाथ पावडर वापरण्याचे फायदे
1. घरच्याघरी तयार केलेल्या या बाथ पावडरमुळे त्वचा स्वच्छ होते. या पावडर मधील बेसन आणि हळद हे घटक त्वचेचा कोरडेपणा, लालसरपणा कमी करतात आणि खाजही बरी करतात.
2. बाथ पावडरमधील चंदन पावडरमध्ये त्वचा मऊ मुलायम करणारे घटक असतात. चंदन पावडरचा उपयोग सौम्य स्वरुपाचा एक्सफोलिएंट म्हणून होतो. चंदनाच्या या गुणधर्मामुळे बाथ पावडरनं आंघोळ केल्यास त्वचेवर चमक येते. शरीरावरील मृत त्वचा निघून जाते.
Image: Google
3. बाथ पावडरचा उपयोग त्वचेची खोलवर स्वच्छता होण्यासाठी होतो. बाथ पावडरमुळे शरीरावरील मृत त्वचा निघून जाते. त्वचेतील अशुध्द घटक बाहेर पडतात. बाथ पावडरमधील बेसन पीठ आणि मसूर डाळीमुळे त्वचा खोलवर स्वच्छ तर होतेच सोबतच त्वचेचं पोषणही होतं.
4. होममेड बाथ पावडरमधील बहुतांश सामग्रीमध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट आणि दाह आणि सूज विरोधी घटक असतात. या घटकांमुळे त्वचेचं संसर्ग आणि ॲलर्जी पासून संरक्षण होतं.