नारळाच्या उत्पानदनांचा वापर केसांवर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. नाराळाचे पाणी असो किवा नारळाचे तेल, नारळाचे दूध ही सर्वच उत्पादनं केसांना मुलायम आणि सुंदर बनवतात.(Beauty Tips) पण नारळाच्या सालीचाही तुम्ही केसांवर उपयोग करू शकता. सामान्यत: नारळाचा वापर करण्याआधी सालं फेकून दिली जातात. (How to blacken Grey Hairs Using Coconut Shell) नारळाच्या सालींचा वापर करून तुम्ही केसांना काळे बनवू शकता. (How to Blacken White Hair Naturally)
आजकाल केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना जाणवते (Pandhare kes kale karnyache upay) पांढरे केस असतील तर सतत डाय किंवा हेअर कलर लावून केस काळे करावे लागतात. पण या केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या वापरामुळे केस पुन्हा पांढरे होण्याची भिती असते. प्राकृतिक उपाय म्हणजेच नारळाच्या सालीचा हेअर डाय बनवून तुम्ही केसांना लावला तर सुंदर लूक येईल. (White Hairs Solution)
नारळाच्या सालीचा हेअर डाय कसा करायचा? (How to make Hair Dye From Coconut Shell)
१) नैसर्गिक हेअर डाय बनवण्यासाठी (Natural Hair Dye) सगळ्यात आधी नारळाचा शेंडा बाजूला काढून घ्या. नंतर ही सांल एका भांड्यात घालून काळी होईपर्यंत परतवून घ्या. जेव्हा व्यवस्थित काळेपणा येईल तेव्हा आचेवरून उतरवून वेगळे करा. नंतर ही सालं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये घालून मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. या पद्धतीने तुम्ही नारळाच्या सालीचे पावडर बनवू शकता.
अभिनेत्रींच्या दाट केसांचं सोपं सिक्रेट -रोज करतात ३ गोष्टी, तुम्हीही फॉलो करा-मिळवा लांब केस
२) केसांना हेअर डाय लावण्यासाठी नारळाच्या सालीच्या पावडरमध्ये एलोवेरा जेल आणि राईचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. केसांच्या मुळापासून लांबीपर्यंत सगळीकडे ही पेस्ट लावा. अर्ध्या तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. या उपायाने केस काळे झालेले दिसून येतील.
३) पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदी आणि इंडिगो पावडरमध्ये मिसळून केसांना लावा. केसांना योग्य प्रमाणात मेंहेदी आणि इंडिगो पावडर पाण्यासोबत मिसळून तुम्ही लावू शकता. ३० ते ४० मिनिटं डोक्याला लावून ठेवल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा.
केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस
४) काळ्या चहाने नियमित केस धुतल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होते. कॉफीनेसुद्धा तुम्ही केस धुवू शकता. कढीपत्ता केसांना काळे बनवण्यासाठी फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात कढीपत्ते मिसळून हे तेल गरम करून घ्या आठवड्यातून २ ते ३ वेळा हे तेल केसांना लावल्यास केसांची चांगली वाढ होईल.