Join us

उन्हाळ्यात त्वचेचे आजार वाढतात, त्वचेची खाज लगेच दूर करतो 'हा' नॅचरल उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:40 IST

Body itching home remedies: अनेकांना त्वचेवर खाज येण्याची समस्या होते. अनेकदा साबण किंवा चुकीच्या प्रोडक्ट्सचा वापर केल्यानं सुद्धा ही समस्या होते.

Body itching home remedies: घाम, धूळ, प्रदूषण, पोषक तत्वांची कमतरता आणि सूर्याची यूव्ही किरणं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. अनेकांना त्वचेवर खाज येण्याची समस्या होते. अनेकदा साबण किंवा चुकीच्या प्रोडक्ट्सचा वापर केल्यानं सुद्धा ही समस्या होते. सामान्यपणे खाजेची समस्या काही दिवसात आपोआप दूर होते. पण अनेकदा ही समस्या अनेक उपाय करूनही दूर होत नाही. अशात त्वचेसंबंधी ही समस्या दूर करण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय तुम्ही करू शकता. ज्याचा वापर करून खाजेची समस्या लगेच दूर होईल. त्वचेवरील खाजेची समस्या दूर करण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचं खास पाणी वापरलं पाहिजे. 

खाज दूर करण्यासाठी कडूलिंब

कडूलिंबाच्या पानांचा वापर नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फार पूर्वीपासून केला जातो. यात अ‍ॅंटी-सेप्टीक, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे त्वचेला निरोगी ठेवतात. तसेच त्वचेतील इन्फ्लेमेशन कमी करतात. त्वचेवर होणारी खाजेची समस्या दूर करण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचा रस वापरू शकता. यानं तुम्हाला लगेच आराम मिळेल.

कडूलिंबाचा ज्यूस

काही कडूलिंबाची पानं वाटून त्यातील रस काढा आणि हा रस आंघोळीच्या पाण्यात टाका. या पाण्यानं तुम्ही दिवसातून दोनदा आंघोळ करू शकता. कडूलिंबाचा रस पाण्यात मिक्स करून आंघोळ केल्यास त्वचा फ्रेश दिसते आणि खाजेची समस्याही दूर होते.

दुसरा उपाय

आंघोळीचं पाणी गरम करताना त्यात मुठभर कडूलिंबाची हिरवी पानं टाका. जेव्हा पाणी चांगलं उकडेल तेव्हा गॅस बंद करा आणि पाणी थोडं थंड होऊ द्या. आता या पाण्यानं त्वचेची मालिश करा. याच पाण्यानं आंघोळ करा. यातील पानं त्वचेवर घासा. या उपायानं देखील त्वचेवरील खाज किंवा इतर समस्या दूर होण्यास मदत मिळते.

फंगल इन्फेक्शन दूर करा

कडूलिंबाचं तेल हे फंगल इंफेक्शन दूर करण्यासाठी प्रामुख्यानं वापरलं जातं. इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या तेलाचे काही थेंब लावावेत. फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी दिवसातून तीन वेळा हा प्रयोग करावा. यामुळे नखांवरील इंफेक्शन देखील दूर होण्यास मदत होते.

कडूलिंबाची पानं

कडूलिंबाची पानं स्वच्छ धुवून त्याची पातळ पेस्ट करावी. यामध्ये लिंबाचा रस व चिमूटभर हळद मिसळावी. तयार पेस्ट त्वचेवर २०-३० मिनिटे लावून सुकू द्यावी. नंतर पाण्याने पाय स्वच्छ धुवावेत. हा प्रयोग नियमित दिवसातून दोनदा केल्यास फंगल इन्फेक्शनपासून बचाव होण्यास मदत होते.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स