काळवंडलेल्या अंडर आर्म्समुळे (Dark Underarms) हैराण झालात? या करणामुळे स्टायलिश कपडे परिधान करणं सोडून दिलात? तर असे करू नका. अंडर आर्म्स अनेक कारणांमुळे काळवंडतात. यावर उपाय म्हणून अनेक महिला विविध प्रॉडक्ट्सचा वापर करतात. पण या प्रॉडक्ट्समुळे अंडर आर्म्स आणखी काळवंडतात. त्यामुळे प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपायांना फॉलो करून पाहा.
आपण काळवंडलेले अंडर आर्म्स तुरटीचा वापर करून स्वच्छ करू शकता. तुरटीमुळे काखेतील काळेपणा निघून तर जाईल, शिवाय याचा त्रास स्किनला होणार नाही. काखेतील काळेपणा नक्की दूर कसा करावा? काळवंडलेल्या अंडर आर्म्सवर तुरटीचा वापर कसा करावा पाहा(Use of Alum for Dark Underarms, 2 best uses of Alum for Skin).
तुरटीतील मुख्य घटक
त्वचा स्वच्छ करण्यासाठी अनेक जण तुरटीचा वापर करतात. तुरटीमध्ये अँटिबायोटिक, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेवर साचलेली घाण, काळपटपणा निघून जाते. आपण याचा वापर काखेतील काळेपणा दूर करण्यासाठीही करू शकता.
काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी तुरटीचा करा असा वापर
उपाय - १
सर्वप्रथम, एका बाऊल एक चमचा तुरटीची पावडर घ्या, त्यात २ ते ३ चमचे गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करा. नंतर त्यात ४ ते ५ थेंब लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार पेस्ट काखेत १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने पेस्ट धुवून काढा. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.
साफसफाई, शॉपिंग, फराळ या कामांमुळे चेहरा डल दिसतोय? ४ घरगुती उपाय, ऐन दिवाळीत चेहरा करेल ग्लो
उपाय - २
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक चमचा तुरटी पावडर, व चिमुटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करा. नंतर त्यात एक कप गुलाब जल घालून स्प्रे तयार करा. तयार मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा, व आंघोळीनंतर काखेत लावा. यामुळे काखेतील काळेपणा निघून जाईल.