धूळ, प्रदुषण किंवा पोषणतत्त्वांची कमतरता यासगळ्या गोष्टींमुळे केस गळण्याची (hair fall) समस्या वाढलेली आहे. एकतर केस वाढतच नाही, त्यांची वाढ (hair growth) खुंटल्यासारखी झाली आहे किंवा मग केस खूपच जास्त गळत आहेत, अशा समस्या अनेक जणांना भेडसावतात. यासगळ्या समस्या कमी करण्यासाठी विड्याचं पान खूपच उपयुक्त ठरू शकतं. विड्याच्या पानांमध्ये (betel leaf or vidyacha paan) कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. हे कॅल्शियम केसांच्या वाढीसाठी आणि त्यांची मुळं मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतं. म्हणूनच केसांसाठी विड्याच्या पानांचा कसा उपयोग करायचा, हे बघूया.. (Home remedies for stimulating hair growth)
विड्याच्या पानांचे केसांसाठी उपयोग
- विड्याच्या पानांमध्ये कॅल्शियम असते. त्यामुळे त्याचा उपयोग केसांना मजबूत करण्यासाठी होतो.
- विड्याच्या पानांमध्ये असणारे व्हिटॅमिन सी तसेच इतर ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक डोक्याच्या त्वचेला पोषण देण्यासाठी मदत करतात.
- त्यामुळे तेथील त्वचेचं इन्फेक्शन दूर होतं आणि त्यामुळे केसांची मुळं पक्की होण्यास फायदा होतो. यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.
केसांसाठी तयार करा विड्याच्या पानांचं तेल
- विड्याच्या पानांचं तेल तयार करून आपण त्याचा केसांसाठी उपयोग करून घेऊ शकताे.
गणपतीसाठी पूजा साहित्याच्या वस्तू, ऑनलाईन स्वस्त आणि मस्त; खरेदीसाठी पाहा आकर्षक पर्याय
- हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला ८ ते १० विड्याची पानं, एक कप कढीपत्त्याची पानं आणि ५ ते ६ जास्वंदाची फुलं आणि एक ते दिड कप खोबरेल तेल एवढं साहित्य लागणार आहे.
- सगळ्यात आधी विड्याची पानं, कढीपत्ता आणि जास्वंदाची फुलं स्वच्छ धुवून घ्या.
- त्यानंतर हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
- आता ही पेस्ट जर समजा एक कप असेल तर त्यासाठी आपल्याला जवळपास दिड कप खोबरेल तेल लागेल.
- मिक्सरमधून वाटलेली पेस्ट आणि तेल एका पातेल्यात एकत्र करा आणि गॅसवर हे मिश्रण उकळण्यासाठी ठेवून द्या.
डार्क सर्कल्स, डोळ्यांभोवती सुरकुत्या कमी करण्यासाठी सोपा उपाय हळदीचा मास्क...डोळे दिसतील सुंदर
- तेल तापवायला सुरुवात केल्यानंतर साधारण १० ते १५ मिनिटांत आपण जी पेस्ट तेलात टाकली होती, तिच्यातलं मॉईश्चर कमी होऊन ती कडक होऊ लागली आहे, असं जाणवेल. तसेच तेलाचा रंगही हिरवा होईल.
- तसं झालं की गॅस बंद करा. थोडावेळ तेल तसंच ठेवून कोमट होऊ द्या. त्यानंतर तेल गाळून घ्या.
- या तेलाचा उपयोग आठवड्यातून दोनदा केल्यास केस गळती निश्चितच कमी होईल तसेच केसांची वाढही भरपूर होईल.
- किमान २ महिने तरी हा प्रयोग नियमितपणे करावा.