दही, ताक (buttermilk) हे पदार्थ घरात बऱ्याचदा असतात. पण आपण मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. एखाद्या पदार्थासोबत दही घेऊन ते तोंडी लावतो. पण दह्याचं ताक करून प्यायला मात्र अनेकजण टाळाटाळ करतात. आरोग्यासाठी ताक नियमित घेणं तर गरजेचं आहेच, पण तुमच्या त्वचेचं आणि केसांचं (buttermilk for skin and hair) बिघडलेलं आरोग्य सुधारण्यासाठीही ताक पिणं अतिशय उपयुक्त ठरतं. केसांतला कोंडा, केसांची वाढ, चेहऱ्यावर आलेले पिंपल्स (pimples) किंवा निस्तेज झालेली त्वचा (dull skin) या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी ताक अतिशय गुणकारी ठरतं.
केसांसाठी ताकाचा वापर
१. डोक्यात वारंवार कोंडा होत असेल, तर आंबट ताक केसांच्या मुळाशी लावून ठेवा. साधारण अर्धा ते पाऊण तासानंतर केस धुवून टाका. आठवड्यातून २ वेळा हा उपाय नियमित करा. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि स्काल्पचा काेरडेपणा निघून जातो.
वॉशिंग मशिन खूपच घाण झालं, डाग पडले? ३ उपाय.. मशिन होईल स्वच्छ, चमकेल अगदी नव्यासारखं
२. केस वाढतच नसतील तर बेसन, ऑलिव्ह ऑईल आणि ताक एकत्रित करावे. हा हेअर मास्क केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मसाज करावा. पाऊण तासानंतर शाम्पू करून कोमट पाण्याने केस धुवून टाकावे.
चेहऱ्यासाठी ताक
१. ताकामध्ये ॲसिडीक घटक असल्याने त्वचेसाठी ते एक नॅचरल टोनर किंवा ॲस्ट्रिंजंट म्हणून काम करते.
पुदिना फेसपॅक! पुदिन्याचे ८ जबरदस्त उपयोग, तुमच्या त्वचेला बनवतील अधिक सुंदर आणि मुलायम
२. ताक आणि काकडीचा रस समप्रमाणात घेऊन एकत्र करा. त्यात चुटकीभर हळद टाका आणि हा लेप चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा लगेचच चमकदार दिसू लागते. इन्स्टंट ग्लो हवा असल्यास, हा उपाय करून बघावा.
३. ताकामध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स भरपूर असल्याने त्वचेला मॉईश्चराईज करण्यास ताक उपयुक्त ठरते. यामुळे त्वचा हायड्रेटेड होत असल्याने चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाणही कमी होते. पिंपल्स येणेही कमी होते.
४. एजिंग इफेक्ट कमी करण्यासाठी ताक आणि ओटमील एकत्र करून चेहऱ्याला लावावे.