Lokmat Sakhi >Beauty > केस एवढे वाढतील आणि दाट होतील की विंचरण्याचाही कंटाळा येईल, बघा त्यासाठी काय करावं....

केस एवढे वाढतील आणि दाट होतील की विंचरण्याचाही कंटाळा येईल, बघा त्यासाठी काय करावं....

Use Of Gokarn Flower For Long Hair: केस खूप पातळ झाले असतील, त्यांची अजिबातच वाढ होत नसेल तर हा एक घरगुती उपाय करून पाहा... (how to make hair thick and grow fast)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2024 01:36 PM2024-07-18T13:36:44+5:302024-07-18T13:38:38+5:30

Use Of Gokarn Flower For Long Hair: केस खूप पातळ झाले असतील, त्यांची अजिबातच वाढ होत नसेल तर हा एक घरगुती उपाय करून पाहा... (how to make hair thick and grow fast)

use of gokarn flower for long hair, best home remedies for thin hair, how to make hair thick and grow fast   | केस एवढे वाढतील आणि दाट होतील की विंचरण्याचाही कंटाळा येईल, बघा त्यासाठी काय करावं....

केस एवढे वाढतील आणि दाट होतील की विंचरण्याचाही कंटाळा येईल, बघा त्यासाठी काय करावं....

Highlightsआठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. काही दिवसांतच केसांची चांगली वाढ होईल....

केस गळण्याची समस्या हल्ली खूप जणांमध्ये दिसून येते. काही काही जणांचे केस तर एवढे जास्त गळत  असतात की अशाच स्पीडने केस गळत राहिले तर एक दिवस टक्कल पडेल की काय अशी भीती वाटते. केस गळणं कमी व्हावं म्हणून अनेक जण वेगवेगळे केमिकलयुक्त प्राॅडक्ट केसांना लावतात (best home remedies for thin hair). कधी त्यांचा चांगला  उपयोग होते तर बऱ्याचदा त्यांचा केसांवर विपरीत परिणाम होऊन केस जास्तच गळू लागतात (use of gokarn flower for long hair). त्यामुळेच केस गळणं कमी करण्यासाठी आणि केसांची चांगली वाढ होण्यासाठी कोणतेही विकतचे केमिकलयुक्त पदार्थ वापरण्यापेक्षा गोकर्णाच्या फुलांचा एका खास पद्धतीने वापर करून पाहा. (how to make hair thick and grow fast)

 

केस दाट, लांब होण्यासाठी गाेकर्णाच्या फुलांचा वापर

केसांची वाढ चांगली होण्यासाठी आणि पातळ झालेले केस पुन्हा दाट करण्यासाठी गोकर्णाच्या फुलांचा कसा वापर करावा, याविषयीची माहिती health_guru_marathi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

गॅस सिलेंडर लगेच संपतं? 'ही' ट्रिक महिन्यातून एकदा करा, गॅसची आणि पैशांची भरपूर बचत... 

यामध्ये असं सांगितलं आहे की एका वाटीमध्ये गोकर्णाची ८ ते १० ताजी फुलं घ्या. त्यामध्ये गरम पाणी टाका आणि हे मिश्रण तसेच राहू द्या. त्यानंतर अर्ध्या तासाने गोकर्णाच्या फुलांचा निळसर रंग पाण्यात उतरेल. हे पाणी केसांच्या मुळाशी स्प्रे करा. यानंतर केस धुतले नाही तरी चालेल. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. काही दिवसांतच केसांची चांगली वाढ होईल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

गोकर्णाचं निळं पाणी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे
वरील पद्धतीने तयार केलेलं गोकर्णाचं पाणी पिणे आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आरोग्याला कोणते लाभ होतात याची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी इन्स्टाग्रामवर  शेअर केली आहे.

Priyanka Chopra Birthday: प्रियांका चोप्राचा 'हा' संघर्ष कुणीच पाहिला नाही, त्यामुळेच तर ती आज.....

१. गोकर्णाचं पाणी दररोज नियमितपणे प्यायल्यास बुद्धीमत्ता वाढण्यास मदत होते.

२. एकाग्रता वाढण्यासाठी गोकर्णाचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

३. गोकर्णाचा काढा नियमितपणे पिणे हा जॉईंट पेन किंवा संधीवातासाठी एक उत्तम आयुर्वेदिक उपाय मानला जातो.

४. दृष्टी कमकुवत झाली असेल तर गोकर्णाचा काढा दररोज नियमितपणे प्या. नजर वाढण्यास मदत होईल.

५. त्वचेच्या अनेक तक्रारी कमी करण्यासाठी गोकर्ण अतिशय उपयोगी आहे.

६. स्ट्रेस कमी करण्यासाठी देखील गाेकर्णाचा काढा उपयुक्त ठरतो.

 

Web Title: use of gokarn flower for long hair, best home remedies for thin hair, how to make hair thick and grow fast  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.