Lokmat Sakhi >Beauty > केस अजिबात वाढत नाही, खूप पातळ झाले? केसांना द्या 'लवंग' टॉनिक! महिनाभरात केस वाढतील

केस अजिबात वाढत नाही, खूप पातळ झाले? केसांना द्या 'लवंग' टॉनिक! महिनाभरात केस वाढतील

Use Of Lavang Or Clove For Fast Hair Growth: केस अजिबात वाढत नसतील, केसांची वाढ खुंटली असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा. (how to control hair fall?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 14:46 IST2024-12-28T14:45:46+5:302024-12-28T14:46:23+5:30

Use Of Lavang Or Clove For Fast Hair Growth: केस अजिबात वाढत नसतील, केसांची वाढ खुंटली असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा. (how to control hair fall?)

use of lavang or clove for fast hair growth, best remedy for reducing Dandruff, how to control hair fall | केस अजिबात वाढत नाही, खूप पातळ झाले? केसांना द्या 'लवंग' टॉनिक! महिनाभरात केस वाढतील

केस अजिबात वाढत नाही, खूप पातळ झाले? केसांना द्या 'लवंग' टॉनिक! महिनाभरात केस वाढतील

Highlightsलवंगमध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल, अँटिफंगल घटक डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी मदत करतात. डोक्यातला कोंडा कमी झाला की आपोआपच केस गळण्याचे प्रमाणही बरेच कमी होते. 

हल्ली केसांच्या बाबतीत समस्या खूप जास्त वाढल्या आहेत. काही जण डोक्यातल्या कोंड्यामुळे वैतागले आहेत (best remedy for reducing Dandruff), तर काही जणांचे केस खूपच गळत आहेत. काही जणींच्या केसांना अजिबातच वाढ नाही, तर काही जणांचे केस अकाली पांढरे होत आहेत. केसांच्या यापैकी बऱ्याच समस्या जर कमी करायच्या असतील तर लवंग वापरून हा एक घरगुती उपाय करून बघा (use of lavang or clove for fast hair growth). काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास केस भराभर वाढण्यास नक्कीच मदत होईल.(how to control hair fall?)

 

केसांच्या वाढीसाठी लवंग वापरा 

केसांची चांगली वाढ व्हावी आणि केस गळणे कमी व्हावे यासाठी लवंगचा वापर कसा करावा, याची माहिती fashionwithfahad या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

१५ मिनिटांत घरीच करा राईस फेशियल, एवढा ग्लो येईल की पार्लरमधले महागडे फेशियलही फिके पडेल

यामध्ये असं सांगितलं आहे की एका भांड्यात २ चमचे तांदूळ घ्या. त्यात २ टीस्पून चहा पावडर आणि ८ ते १० लवंगा टाका. त्यामध्ये १ कप पाणी टाकून हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा. 

दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गाळून घ्या आणि गाळलेलं पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. या पाण्यातच लवंगाही टाका.

 

रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी केसांच्या मुळाशी लावा किंवा केस धुण्याच्या आधी १ तास हे पाणी केसांच्या मुळाशी लावून हळुवारपणे मसाज करा. यानंतर नेहमीप्रमाणे केस धुवून टाका. 

हिवाळ्यात केस खूप कोरडे होतात? कोरफडीमध्ये 'हा' पदार्थ टाकून लावा, रेशमासारखे मऊ होतील केस

लवंगमध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल, अँटिफंगल घटक डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी मदत करतात. डोक्यातला कोंडा कमी झाला की आपोआपच केस गळण्याचे प्रमाणही बरेच कमी होते. 

याशिवाय लवंगमध्ये असणारे काही घटक त्वचेतले रक्ताभिसरण अधिक वेगवान करतात. यामुळे केसांच्या मुळाशी उत्तम ऑक्सिजन मिळते आणि केसांची वाढ जोमात होते.


 

Web Title: use of lavang or clove for fast hair growth, best remedy for reducing Dandruff, how to control hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.