Lokmat Sakhi >Beauty > देवाला वाहिलेली झेंडूची फुलं फेकू नका, सुकलेल्या फुलांचे २ भन्नाट उपयोग- त्वचा होईल सुंदर- मऊ

देवाला वाहिलेली झेंडूची फुलं फेकू नका, सुकलेल्या फुलांचे २ भन्नाट उपयोग- त्वचा होईल सुंदर- मऊ

2 Best Re use of Marigold Flower: दसऱ्यासाठी आणलेली झेंडूची फुले उरली असतील किंवा तोरणामध्ये लावलेली फुलं सुकली असतील तर त्याचा असा मस्त उपयोग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 01:01 PM2023-10-25T13:01:04+5:302023-10-25T13:02:31+5:30

2 Best Re use of Marigold Flower: दसऱ्यासाठी आणलेली झेंडूची फुले उरली असतील किंवा तोरणामध्ये लावलेली फुलं सुकली असतील तर त्याचा असा मस्त उपयोग करा

Use of leftover marigold flower as a scrub and fertilizer for plants, How to reuse marigold flower?  | देवाला वाहिलेली झेंडूची फुलं फेकू नका, सुकलेल्या फुलांचे २ भन्नाट उपयोग- त्वचा होईल सुंदर- मऊ

देवाला वाहिलेली झेंडूची फुलं फेकू नका, सुकलेल्या फुलांचे २ भन्नाट उपयोग- त्वचा होईल सुंदर- मऊ

Highlightsदेवाला वाहिलेली किंवा तोरण म्हणून लावलेली फुलं सुकली असतील तर त्या फुलांचे खूप छान असे दोन उपयोग करता येतील

दसरा- दिवाळीच्या दिवसांमध्ये झेंडूच्या फुलांचे महत्त्व खूप असते. त्यामुळे घराला तोरण बांधण्यासाठी, देवाला वाहण्यासाठी, रांगोळीत वापरण्यासाठी आपण भरपूर झेंडूची फुले आणतो. यावर्षी तर झेंडू खूप स्वस्त होते. त्यामुळे अनेक जणांनी भरपूर फुले आणली. आता तुम्ही आणलेली फुलं जर उरली असतील आणि देवाला वाहिलेली किंवा तोरण म्हणून लावलेली फुलं सुकली असतील तर त्या फुलांचे खूप छान असे दोन उपयोग करता येतील (How to reuse marigold flower? ). त्यामुळे त्वचा तर मऊ होईलच (Use of waste marigold flower as a scrub) शिवाय झाडांनाही छान नैसर्गिक खत मिळेल (fertilizer for plants). त्यामुळे झेंडुची फुले फेकू नका, त्याचा वापर कसा करायचा ते पाहा...

 

सुकलेल्या झेंडूच्या फुलांचे उपयोग

१. त्वचेसाठी स्क्रब

हात किंवा पाय, मान, पाठ यावर टॅनिंग झालं असेल किंवा ते खूप काळवंडले असतील तर ती त्वचा स्वच्छ करण्यासाठी झेंडूच्या फुलांचं स्क्रब घरच्या घरी तयार करता येते. यासाठी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या काढून घ्या.

डाएट- व्यायाम नेहमी करूनही वजन अचानकच वाढायला लागतं? त्याची ६ कारणं, बघा 'असे' होते का?

त्या मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडी- भरडी पेस्ट करून घ्या. त्यामध्ये थोडी साखर टाका आणि थोडा मध टाका. हे मिश्रण हात, पाय, पाठ, मान या त्वचेवर हलक्या हाताने चोळून लावा आणि नंतर स्वच्छ धुऊन घ्या. त्वचा स्वच्छ, मऊ- मुलायम होईल. चेहऱ्यासाठी याचा उपयोग करू नका.

 

२. झाडांसाठी खत

ज्या झाडांना फुले येत नाही अशा झाडांना जर झेंडूचं खत घातलं तर खूप फायदा होतो. झाडांसाठी झेंडूचा वापर करण्यासाठी झेंडूची फुले मिक्सर मधून वाटून घ्या.

तडे पडलेले - पांढरे झालेले नॉनस्टिक पॅन वापरणं ताबडतोब थांबवा, कारण डॉक्टर बघा काय सांगतात

३०० ग्रॅम झेंडूची फुले असतील तर त्याला दहा ग्रॅम गूळ घाला आणि १ हजार मिली पाणी घाला. हे सगळं मिश्रण एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून ठेवा आणि अडीच ते तीन महिने ती बाटली सूर्यप्रकाश येणार नाही अशा ठिकाणी ठेवा. यादरम्यान बाटलीमध्ये बायो एन्झाईम तयार होईल. ते झाडांवर शिंपडा. यामुळे झाडाला भरपूर फुल येण्यास मदत होईल. शिवाय झाडांवर रोग पडणार नाहीत. 
 

Web Title: Use of leftover marigold flower as a scrub and fertilizer for plants, How to reuse marigold flower? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.