गणपतीचं आवडीचं फूल आहे जास्वंद. त्यामुळे आपण गणपतीला कितीही वेगवेगळ्या फुलांचे हार घातले तरी त्याला जास्वंद आवर्जून वाहतोच. शिवाय या दिवसांत जास्वंदालाही बहर आलेला असतो. त्यामुळे जास्वंदाची फुलंही भरपूर प्रमाणात येतात. आता गणपतीला वाहिलेली फुलं दुसऱ्या दिवशी सुकतात. त्यामुळे मग आपण ती काढून टाकतो. पण सुकली म्हणून ही फुलं मुळीच फेकून देऊ नका. कारण जास्वंद केसांसाठी अतिशय उपयुक्त असून या सुकलेल्या फुलांचा खूप चांगला उपयोग केसांसाठी करता येतो. (Use of Leftover or dry Hibiscus flower or Jaswand for hair care)
जास्वंदाच्या सुकलेल्या फुलांचा केसांसाठी उपयोग
१. जास्वंदाच्या फुलांचा हेअर पॅक
निर्माल्यातली जास्वंदाची फुले वापरून खूप चांगला हेअर पॅक करता येतो. यासाठी निर्माल्यातली जास्वंदाची फुले मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
फक्त २० रुपयांत सगळं घर होईल एकदम स्वच्छ- चकाचक, ते ही कमी मेहनतीत.. कसं?? पाहा ८ भन्नाट उपाय
ही पेस्ट जेवढी असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात त्यात कोरफडीचा गर घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून हा लेप केसांच्या मुळाशी लावा. अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका. केस चमकदार, सिल्की होतील.
२. जास्वंदाचं तेल
जास्वंदाचं तेल केसांसाठी किती उपयुक्त आहे हे आपण जाणतोच. हे तेल घरी करायलाही अगदी सोपं आहे. ते कसं करायचं ते आता पाहूया.
गणपती- गौरीसाठी करा तांबूल, घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास पदार्थ, छानसा तांबूल वाढवेल रंगत
सगळ्यात आधी तर जास्वंदाची फुलं हाताने तोडून घ्या. ७ ते ८ फुलं असतील तर त्यासाठी एक ते दिड वाटी तेल घ्या. तेल आणि जास्वंदाच्या फुलांचे तुकडे एका पातेल्यात एकत्र करा. त्यात एक बारीक आकाराचा कांदाही चिरून टाका. हे तेल गॅसवर उकळायला ठेवा. जेव्हा जास्वंदाची फुलं आणि कांद्याच्या फोडी कडक होतील, तेव्हा गॅस बंद करा. तेल थंड झालं की गाळून घ्या. या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करा आणि त्यानंतर एक- दोन तासांनी केस धुवून टाका. केसांची मुळं पक्की होण्यास मदत होईल. त्यामुळे केस गळतीही कमी होईल.