Lokmat Sakhi >Beauty > उरलेल्या भाताचा उपयोग करून मिळवा चमकदार त्वचा! खास उपाय, ॲक्ने- डार्क सर्कल्सही होतील कमी

उरलेल्या भाताचा उपयोग करून मिळवा चमकदार त्वचा! खास उपाय, ॲक्ने- डार्क सर्कल्सही होतील कमी

Beauty Care With Boiled Rice: वाचून आश्चर्य वाटलं ना? पण उरलेल्या भाताचा असा मस्त उपयोग तुमचे सौंदर्य खुलविण्यासाठी नक्कीच करता येतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 07:27 PM2022-12-07T19:27:25+5:302022-12-07T19:27:49+5:30

Beauty Care With Boiled Rice: वाचून आश्चर्य वाटलं ना? पण उरलेल्या भाताचा असा मस्त उपयोग तुमचे सौंदर्य खुलविण्यासाठी नक्कीच करता येतो..

Use of leftover rice for skin brightning, How to use boiled rice for skin care? | उरलेल्या भाताचा उपयोग करून मिळवा चमकदार त्वचा! खास उपाय, ॲक्ने- डार्क सर्कल्सही होतील कमी

उरलेल्या भाताचा उपयोग करून मिळवा चमकदार त्वचा! खास उपाय, ॲक्ने- डार्क सर्कल्सही होतील कमी

Highlightsत्वचेवरचे काळे डाग, ॲक्ने आणि डार्क सर्कल्सही कमी होतील. इव्हन स्किन टोन मिळविण्यासाठीही हा उपाय उत्तम असल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

फळांमध्ये, घरातल्या मसाल्यांमध्ये आणि घरी तयार होणाऱ्या पदार्थांमध्येही अशी अनेक पोषण मुल्ये असतात, जे आपल्या आरोग्यासाठी तर फायदेशीर ठरतातच. पण सौंदर्य वाढविण्यासाठीही उपयोगी असतात. असाच एक पदार्थ म्हणजे भात. तांदळाचा किंवा राईस वॉटरचा उपयोग करून सौंदर्य कसे वाढवायचे, याचे आपण अनेक प्रयोग पाहिले आहेत. कोरियन महिलांच्या ग्लास स्किनचं सिक्रेट राईस वॉटर आहे, असं मानलं जातं. आता शिजवलेला भात (Use of leftover rice for skin brightning) त्वचेसाठी कसा उपयुक्त ठरू शकतो, हे बघू या.(How to use boiled rice for skin care)

 

हा उपाय इन्स्टाग्रामच्या beautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शिजवलेल्या भाताचा उपयोग करून त्वचेसाठी क्रिम किंवा स्किन केअर मास्क कसा तयार करायचा, याविषयी माहिती देण्यात आली आहे.

काकूंनी केला भन्नाट कोंबडी डान्स! लग्नात इतक्या जबरदस्त नाचल्या की... पाहा व्हायरल व्हिडिओ

त्यामुळे आता घरी कधी जर थोडासा भात उरला असेल, तर त्याचा असा त्वचेसाठी उपयोग करून बघू शकता. हा उपाय केल्यामुळे त्वचा चमकदार तर होईलच पण त्वचेवरचे काळे डाग, ॲक्ने आणि डार्क सर्कल्सही कमी होतील. इव्हन स्किन टोन मिळविण्यासाठीही हा उपाय उत्तम असल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

 

उरलेल्या भातापासून कसं तयार करायचं क्रिम?
साहित्य

२ टेबलस्पून शिजवलेला भात
१ टीस्पून खोबरेल तेल
अर्ध्या लिंबाचा रस

Google Search: २०२२ मध्ये सगळ्यात जास्त शोधली गेलेली रेसिपी! तुम्हीही पनीरच्या 'या' पदार्थाचा शोध घेतला होता का?
१ टीस्पून ग्लिसरीन
१ टीस्पून ऑलिव्ह ऑईल
२ टीस्पून रोज वॉटर
अर्धा कप दूध
कृती 
१. हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.

२. बारीक पेस्ट गाळणीतून गाळून घ्या चेहऱ्यासाठी क्रिम झालं तयार. हे क्रिम आता एका एअरटाईट बरणीत भरून ठेवा.

बाळंतपणानंतर एका महिन्यातच आलिया भटने सुरू केला योगा, बघा डिलिव्हरीनंतर अभिनेत्रींनी कसा केला वेटलॉस

३. ही बरणी फ्रिजमध्ये ठेवल्यास ३ ते ४ दिवस तुम्ही हे क्रिम वापरू शकता. 

४. रात्री झोपताना चेहऱ्याला क्रिम लावून हलक्या हाताने मसाज करा. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवा. 


 

Web Title: Use of leftover rice for skin brightning, How to use boiled rice for skin care?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.