Lokmat Sakhi >Beauty > करा फक्त १ चमचा मेथीचा साेपा उपाय- केस होतील दाट आणि गळणं तर कायमचं बंद

करा फक्त १ चमचा मेथीचा साेपा उपाय- केस होतील दाट आणि गळणं तर कायमचं बंद

Use Of Methi Dana or Fenugreek Seeds For Hair Growth: केस खूप गळत असतील तर बाकी सगळे उपाय सोडा आणि हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 04:26 PM2024-02-23T16:26:31+5:302024-02-23T19:06:26+5:30

Use Of Methi Dana or Fenugreek Seeds For Hair Growth: केस खूप गळत असतील तर बाकी सगळे उपाय सोडा आणि हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा....

Use of methi dana or fenugreek seeds for hair growth, How to use methi dana for controlling hair fall, use of fenugreek seed for long and strong hair | करा फक्त १ चमचा मेथीचा साेपा उपाय- केस होतील दाट आणि गळणं तर कायमचं बंद

करा फक्त १ चमचा मेथीचा साेपा उपाय- केस होतील दाट आणि गळणं तर कायमचं बंद

Highlights केस गळण्याचा त्रास तुम्हालाही होत असेल तर मेथी दाण्यांचा हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा.

केस गळण्याची समस्या हल्ली खूप वाढली आहे. काही काही जणांवर तर केस गळून अगदी टक्कल पडण्याची वेळ आली आहे. बऱ्याच महिलांचीही अशी तक्रार असते की कपाळावरचे केस खूपच गळाले असल्याने हेअरलाईन मागे गेली आणि कपाळ खूप मोठे वाटू लागले.. तसेच ज्या केसांचा भांग पाडतात, त्यांच्या भांगातले केसही विरळ होऊन तिथेही टक्कल पडल्यासारखे वाटते. किंवा कपाळाच्या दोन्ही बाजूंवरचे केसही अनेक जणींचे विरळ झालेले असतात (How to use methi dana for controlling hair fall). असा केस गळण्याचा त्रास तुम्हालाही होत असेल तर मेथी दाण्यांचा हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा. (use of fenugreek seed for long and strong hair)

 

केस गळणं थांंबविण्यासाठी मेथी दाण्यांचा उपयोग

केस गळणं थांबविण्यासाठी मेथी दाण्यांचा कसा उपयोग करायचा, याचा उपाय prajakृूर्ंर्ुta_salve_marathi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

तेल, तूप मुळीच न घालता करा चवदार भाज्या, बघा पौष्टिक भाज्या करण्याची व्हायरल रेसिपी

हा उपाय करण्यासाठी आपल्याला रात्री १ टेबलस्पून मेथी दाणे अर्धी वाटी पाण्यात भिजत घालायचे आहेत.

त्यानंतर दुसऱ्यादिवशी भिजलेले मेथी दाणे त्या पाण्यासकट शिजवायला ठेवा. त्यात आणखी अर्धी वाटी पाणी घाला. ८ ते १० मिनिटे पाणी उकळवून त्यात मेथी दाणे चांगले शिजवून घ्या. 

 

यानंतर गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या. आता हे गाळून घेतलेलं पाणी साधारण १ वाटी असेल तर त्यात ३ टेबलस्पून व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका. आता हा स्प्रे डोक्यावर केसांच्या मुळांशी मारा. यानंतर साधारण ३० मिनिटांनी केस धुवून टाका. 

किचनमध्ये ठेवा पॉझिटीव्ह एनर्जी देणारी ५ रोपं.. स्वयंपाक करताना मन राहील प्रसन्न- फ्रेश

आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा. एकदा करून ठेवलेलं पाणी तुम्ही १५ ते २० दिवस वापरू शकता. हा उपाय नियमितपणे केल्यास विरळ झालेल्या भागांतही चांगले केस उगवतील, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

Web Title: Use of methi dana or fenugreek seeds for hair growth, How to use methi dana for controlling hair fall, use of fenugreek seed for long and strong hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.