Join us  

कमी वयातच डोळ्यांभोवती सुरकुत्या? १ खास फेसपॅक लावा, १५ दिवसांत त्वचा होईल टाईट-दिसेल तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 1:23 PM

Natural Anti Aging Facepack For Young Skin: इतर सगळे महागडे ॲण्टी एजिंग फेसपॅक सोडा आणि हा सोपा प्रयोग करून पाहा... (use of moringa leaves for young glowing skin)

ठळक मुद्देत्वचेवर नुकत्याच सुरकुत्या दिसायला सुरुवात झाली असेल तर त्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयी....

हल्ली कमी वयातच अनेक जणींच्या डोळ्यांभोवती, ओठांच्या दोन्ही बाजुंच्या कोपऱ्यांजवळच्या भागात सुरकुत्या पडलेल्या दिसतात. कपाळावरही पुसटशा सुरकुत्या दिसू लागतात. आपल्या त्वचेला नेहमीच धूर, धुळ, प्रदुषण, ऊन यांचा सामना करावा लागतो. शिवाय बऱ्याचदा कामाच्या गडबडीत त्वचेकडे म्हणावं तसं लक्ष देणं होत नाही. आहारातूनही पौष्टिक पदार्थ घ्यायला आपण कमी पडतो. याचा सगळ्यांचा परिणाम त्वचेवर दिसून येतो आणि मग त्यामुळेच कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या यायला सुरुवात होते (use of moringa leaves for young glowing skin). असंच तुमचंही झालं असेल तर त्यासाठी वेळीच हा एक उपाय करा (home remedies for wrinkle free skin). कोणत्याही महागड्या ॲण्टी एजिंग फेसपॅकपेक्षा हा नैसर्गिक फेसपॅक जास्त परिणामकारक आहे. (how to get rid of fine lines and wrinkles from skin)

 

त्वचेवरील सुरकुत्या घालविण्यासाठी उपाय

त्वचेवर नुकत्याच सुरकुत्या दिसायला सुरुवात झाली असेल तर त्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयीचा व्हिडिओ sarikazbeautytips या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

पुण्यात झिकाचे २ रुग्ण, आजाराची लक्षणं कशी ओळखायची? डॉक्टर सांगतात झिकाची लागण होऊ नये म्हणून....

यामध्ये शेवग्याच्या कोवळ्या पानांचा वापर करण्यास सांगितले आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार शेवग्याचा पाला हा चमकदार त्वचेसाठी नॅचरल पॉवरहाऊस म्हणून काम करतो. त्यामध्ये असणारे काही घटक त्वचेला नेहमीच तरुण ठेवण्यासाठी मदत करतात. त्वचेतला घट्टपणा, हायड्रेशन टिकवून ठेवतात आणि त्वचेमधील कोलॅजिनच्या निर्मितीसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे आपोआपच त्वचा तरुण आणि चमकदार होते.

 

त्यामुळे हा उपाय करण्यासाठी शेवग्याची १५ ते २० कोवळी पाने घ्या. त्यामध्ये दोन ते तीन चमचे कच्चं दूध, १ चमचा मध टाका आणि ती पानं मिक्सरमधून वाटून घ्या. हे वाटण वाटीमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये १ चमचा तांदळाचं पीठ टाका. आता सगळं मिश्रण पुन्हा सगळं एकत्र करून हा लेप चेहऱ्याला लावा आणि १५ ते २० मिनिटांनी धुवून टाका.

व्यायाम करण्यापुर्वी केळी खाण्याचे ५ फायदे, अनेक सेलिब्रिटी वर्कआऊट करण्याआधी केळी खातात, कारण....

हा उपाय एकदा केला तरी त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल. एकदा हा लेप तयार करून तुम्ही तो फ्रिजमध्ये ७ दिवसांसाठी ठेवू शकता. दररोज चेहऱ्याला लावल्यास काही दिवसांतच त्वचेवरच्या बारीक सुरकुत्या कमी झालेल्या दिसतील. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी