सुंदर दिसण्यासाठी, आपला चेहरा अधिक आकर्षक दिसण्यासाठी फेशियल हेअर काढणं यात आता काहीच नाविन्य राहिलेलं नाही. काही बोटांवर मोजण्याएवढ्या महिला सोडल्या तर बहुतांश महिला हे करतातच. एवढंच नाही तर हल्ली इयत्ता ९ वी, १० वीमध्ये गेलेल्या किशोरवयीन मुलीही थ्रेडींग, आयब्रोज अशा ब्यूटी ट्रिटमेंट्स घेतात. ज्यांना वारंवार पार्लरमध्ये जाणं शक्य नसतं, अशा महिला किंवा मुली घरच्याघरीही व्हॅक्स, प्लकर वापरून फेशियल हेअर अक्षरश: उपटून काढतात (which is the best and safe method for removing facial hair?). पण असं करणं त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतं, असा सल्ला सौंदर्यतज्ज्ञ देत आहेत.(use of plucker, wax for removing facial hair is vary dangerous)
फेशियल हेअर उपटून काढल्याने काय होतं?
घरच्याघरी प्लकर किंवा व्हॅक्स वापरून फेशियल हेअर उपटून काढल्यामुळे त्वचेचं काय नुकसान होऊ शकतं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ सौंदर्यतज्ज्ञांनी dr.animesh_ms या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
लग्नसराई स्पेशल : छोट्या केसांची कशी हेअरस्टाईल करावी? ७ आयडिया, ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसा देखण्या
काही महिला घरच्याघरी प्लकर वापरून चेहऱ्यावरचे जे केस उपटून काढतात त्यामुळे त्वचेचं नुकसान होतं. त्वचा लवकर सैल पडते. शिवाय त्यामुळे केसांच्या मुळाशी त्वचेला इजासुद्धा होऊ शकते. त्वचा लालसर होणं, त्वचेवर लाल पुरळ उठल्यासारखं होणं, आतल्याआत त्वचेवर सूज येणं असे त्रासही होऊ शकतात.
यासाठी तज्ज्ञ मंडळींचीच मदत घ्या आणि त्वचेवरचे हे सगळे उपाय पार्लरमध्ये जाऊन तज्ज्ञांकडूनच करून घ्या.
प्लकर किंवा व्हॅक्स वापरण्याऐवजी ट्रिमर वापरण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. कारण ट्रिमर वापरताना केस मुळापासून ओढले जात नाहीत आणि त्यामुळे त्वचेचं नुकसान होत नाही.
मार्गशीर्ष गुरुवार : देवीसाठी करा 'हा' नैवेद्य, झटपट होणारा चविष्ट पदार्थ-रेसिपीही सोपी आणि पौष्टिक
प्लकर किंवा व्हॅक्स वापरून केस उपटून काढण्यापेक्षा हेअर रिमुव्हल क्रिम वापरणं अधिक योग्य. किंवा तुम्हाला जर त्यावरचा कायमचा उपाय पाहिजे असेल तर लेझर करून फेशियल हेअर काढून टाका असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.