Lokmat Sakhi >Beauty > फक्त एका बटाट्याची जादू! डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळंच नाही तर चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही होतील गायब

फक्त एका बटाट्याची जादू! डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळंच नाही तर चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही होतील गायब

Beauty Tips For Dark Circles And Wrinkles: डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आली असतील आणि डोळ्याच्या आसपासची त्वचा सुरकुतायला सुरुवात झाली असेल, तर हा उपाय लगेचच करून बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 02:06 PM2023-08-11T14:06:21+5:302023-08-11T14:07:13+5:30

Beauty Tips For Dark Circles And Wrinkles: डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आली असतील आणि डोळ्याच्या आसपासची त्वचा सुरकुतायला सुरुवात झाली असेल, तर हा उपाय लगेचच करून बघा

Use of potato for removing dark circles, Best home remedies for wrinkle free skin | फक्त एका बटाट्याची जादू! डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळंच नाही तर चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही होतील गायब

फक्त एका बटाट्याची जादू! डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळंच नाही तर चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही होतील गायब

Highlightsदोन- तीन दिवसांतून एकदा हा उपाय केल्यास लवकरच चांगला फरक दिसून येईल. 

बटाट्याची भाजी, आलू के पराठे हे सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ. स्वयंपाक करतानाही एखाद्या भाजीला बटाट्याची जोड अगदी सहज देऊन टाकता येते. शिवाय त्याचे चाहतेही अनेक आहेत, त्यामुळे इतर भाज्यांमधली बटाट्याची ही लुडबूड सगळ्यांनाच चालून जाते. हा सगळ्यांच्या आवडीचा बटाटा तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठीही निश्चितच उपयोगी ठरणारा आहे (Use of potato for removing dark circles). डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे आणि डोळ्यांच्या आसपास असणाऱ्या बारीकशा सुरकुत्या कमी करण्यासाठी ( home remedies for wrinkle free skin) बटाट्याचा उपयोग नेमका कसा करायचा, ते पाहूया.. 

 

बटाट्याला नॅचरल ब्लीच म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच ब्लीच करून तुमच्या त्वचेला जो फायदा होतो, त्यासारखा फायदा बटाट्याचा नैसर्गिक उपयोग करून होऊ शकतो. म्हणूनच आता डोळ्यांखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी बटाट्याचा कसा वापर करायचा ते आपण पाहूया.

आता फक्त १ हजार रुपयांत मिळतेय आलिया भटची 'रानी'फेम शिफॉन साडी! गुलाबी साडीची क्रेझ

या उपायामुळे डोळ्यांच्या आसपास असणाऱ्या बारीकशा सुरकुत्याही कमी होऊ शकतात. हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला ४ पदार्थ लागणार आहेत. हा उपाय इन्स्टाग्रामच्या makeup_sakeup या पेजवर सुचविण्यात आला आहे.

 

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी बटाट्याचा उपयोग
१. हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ टीस्पून बटाट्याचा रस, १ टीस्पून कॉफी पावडर, १ टी स्पून हळद आणि १ टीस्पून मध लागणार आहे.

२. हे सगळं साहित्य एका वाटी एकत्र करा आणि व्यवस्थित हलवून घ्या.

दुपारच्या जेवणाची योग्य वेळ काेणती, उशीर झाला तर ॲसिडीटी वाढते- सुस्ती येते? तज्ज्ञ सांगतात ३ उपाय

३. त्यानंतर डाेळ्यांभोवती हळूवार हाताने हा लेप लावा आणि १० मिनिटांसाठी तसाच राहू द्या.

४. यानंतर थंड पाण्याने हा लेप अलगद पुसून घ्या.

५. दोन- तीन दिवसांतून एकदा हा उपाय केल्यास लवकरच चांगला फरक दिसून येईल. 
 

Web Title: Use of potato for removing dark circles, Best home remedies for wrinkle free skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.