Join us  

केस वाढतच नाहीत? तांदळाच्या पाण्याचा सोपा उपाय करा, भराभर वाढून केस होतील लांबसडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 9:11 AM

Home Remedies For Long Hair: केसांची वाढ होत नसेल तर हा एक घरगुती उपाय करून पाहा.. भराभर वाढतील केस

ठळक मुद्देआठवड्यातून एकदा हा उपाय केला तरी महिनाभरातच केस चांगले वाढलेले दिसतील. 

काही जणींच्या केसांना खूप वाढ असते. तर त्याउलट काही जणींचे केस मात्र अजिबातच वाढत नाहीत. महिनोंमहिने उलटून जातात, तरी केसांची म्हणावी तशी वाढ झालेली नसतेच. तुमच्याही केसांच्या बाबतीत हीच समस्या असेल तर आता हा एक घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय केल्याने केस गळणं तर कमी होईलच, पण केसांची वाढ देखील खूप भराभर होईल (Use of rice water for boosting hair growth). अगदी एखादा महिना जरी हा प्रयोग नियमितपणे करून पाहिला तरीही केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येईल. शिवाय केस सिल्की आणि चमकदार होतील. (what to do for fast hair growth?)

केस भराभर वाढावेत म्हणून उपाय

 

केस गळणं कमी होऊन त्यांची चांगली वाढ व्हावी, यासाठी कोणता घरगुती उपाय करायचा, याची माहिती beautywithsangeetaverma या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

नाश्ता करताना फक्त २ गोष्टी लक्षात ठेवा, नेहमीच राहाल फिट- वजनही वाढणार नाही

साहित्य

२ टेबलस्पून तांदूळ

१ टेबलस्पून ॲलाेव्हेरा जेल

१ टेबलस्पून कॅस्टर ऑईल

१ व्हिटॅमिन ई कॅप्सूल

 

कृती

सगळ्यात आधी तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यात अर्धी ते एक वाटी पाणी घालून ते २४ तास पाण्यात भिजवत ठेवा. 

२४ तास झाल्यानंतर तांदाळाचं पाणी गाळून घ्या. या पाण्यात ॲलोव्हेरा जेल, कॅस्टर ऑईल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका.

'या' ५ चुका कराल तर व्यायाम- डाएट करूनही वजन कमी होणारच नाही, बघा नेमकं कुठे चुकतं

आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

हे पाणी आठवड्यातून एकदा केसांना लावा आणि केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मालिश करा. रात्री हा उपाय केला आणि सकाळी उठून नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.

आठवड्यातून एकदा हा उपाय केला तरी महिनाभरातच केस चांगले वाढलेले दिसतील. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी