Lokmat Sakhi >Beauty > पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा फक्त ३ गोष्टी, पाहा झटपट सोपे उपाय...

पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा फक्त ३ गोष्टी, पाहा झटपट सोपे उपाय...

Tips to Get Rid From White Hair Problem : हेअर डायपेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास आपले केस नैसर्गिकरित्याच काळे होऊ शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 10:28 AM2022-08-29T10:28:09+5:302022-08-29T10:30:02+5:30

Tips to Get Rid From White Hair Problem : हेअर डायपेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास आपले केस नैसर्गिकरित्याच काळे होऊ शकतात.

Use only 3 things to turn white hair black, see the quick and easy solution... | पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा फक्त ३ गोष्टी, पाहा झटपट सोपे उपाय...

पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा फक्त ३ गोष्टी, पाहा झटपट सोपे उपाय...

Highlightsकाळ्या चहामध्ये मेहंदी घालून केसांना लावल्यास त्याचाही अतिशय चांगला उपयोग होतो. पांढऱ्या केसांमुळे काही वेळा आत्मविश्वास कमी झाल्याचे किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण झाल्याचेही पाहायला मिळते

वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अनुवंशिकता किंवा आहारातून पुरेसे पोषण न मिळाल्याने आजकाल लोकांचे केस कमी वयात पांढरे होतात. पांढरे केस पुन्हा काळे करणे इतके अवघड नाही, मात्र त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रतीचे आपल्याला सूट होतील असे उपाय करावे लागतात (White Hairs Treatment). मग हे पांढरे झालेले केस आपण कधी पार्लरमध्ये जातो तर कधी केसांना घरच्या घरीच रंग लावतो. मात्र सतत हेअर डाय केल्याने केसांचा पोत बिघडण्याची शक्यता असते. (How to Stop Gray Hairs Naturally) हेअर डायमध्ये असणारी रसायने केस खराब तर करतातच पण यामुळे केसांच्या इतर समस्या वाढू शकतात (Hair Care Tips). त्यामुळे डायपेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास आपले केस नैसर्गिकरित्याच काळे होऊ शकतात. (Tips to get rid white hair problem)

एकदा हे केस पांढरे झाले की सगळे आपल्याला म्हातारी म्हणून चिडवायला लागतात. कमी वयातच केस पांढरे झाल्यामुळे आपण तणावात येतो आणि या केसांचे प्रमाण वाढायला लागले की मग काय करायचे आपल्याला काहीही सुचत नाही. पांढरे केस फक्त वयस्करपणाच नाही तर शारीरिक कमतरता दर्शवतात. तर आजकाल ही समस्या अगदी लहान वयात दिसून येत आहे. वयाच्या विशी-तिशीपासून ही समस्या मागे लागते आणि मग केस काळे करण्याचे एक कामच आपल्यामागे लागते. पांढऱ्या केसांमुळे काही वेळा आत्मविश्वास कमी झाल्याचे किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण झाल्याचेही पाहायला मिळते. याचा आपल्या व्यक्तीमत्त्वावर परिणाम होतो. यावर घरच्या घरी करता येतील असे उपाय काय ते पाहूयात.

आवळा 

आवळा आहारात घेण्यासाठी ज्याप्रमाणे चांगला असतो त्याचप्रमाणे केसांसाठीही आवळा अतिशय उपयुक्त असतो. आवळ्याच्या रसात खोबरेल तेल घालून त्याने केसांच्या मूळांना मसाज करा. यामुळे तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचू शकतात. इतकेच नाही तर पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तरी त्याचे प्रमाण कमी होऊ शकते. आपण आवळ्याचा हेअर मास्कही तयार करुन तो केसांना लावू शकतो. त्याचाही चांगला फायदा होऊ शकतो. केसांना आवळा लावण्याबरोबरच दररोज न चुकता आहारात आवळ्याचा समावेश केल्यास त्याचाही फायदा होतो. 

काळा चहा 

पूर्वीपासून केस काळे करण्यासाठी काळा चहा हा एक उत्तम उपाय म्हणून ओळखला जातो. काळा चहा पाण्यात उकळून गार करा. त्यानंतर हा चहा केसांना लावा आणि १ तासासाठी केस तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या शाम्पूने केस धुवून टाका. यामुळे केस काळे होण्यास तर मदत होईलच पण केसांना चमक येण्यासाठीही याचा चांगला उपयोग होईल. काळ्या चहामध्ये मेहंदी घालून केसांना लावल्यास त्याचाही अतिशय चांगला उपयोग होतो. 

कॉफी 

काळ्या चहाप्रमाणेच कॉफी हाही केसांचा पोत सुधारण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. यासाठी एक कपण पाण्यात एक चमचा कॉफी पावडर घालून ती उकळा. कॉफी गार झाल्यावर त्यामध्ये मेहंदी घालून ते चांगले मिक्स करा. साधारणपणे १ तास हे मिश्रण केसांना लावून ठेवा. त्यामुळे पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होईल.  

Web Title: Use only 3 things to turn white hair black, see the quick and easy solution...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.