Join us  

अती पिकलेली केळी फेकून न देता ४ प्रकारे वापरा, चेहरा दिसेल तुकतुकीत-चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2023 7:03 PM

Use overripe bananas to make a home-made face pack! अती पिकलेली केळी खाता येत नाहीत म्हणून फेकून देताय? बघा स्मार्ट उपयोग

केळी हे वर्षभर मिळणारे फळ. केळी फक्त शरीरासाठी नाही तर, त्वचा व केसांसाठी देखील उपयुक्त आहे. कच्च्या व पिकलेल्या केळांचा वापर  होतोच, पण अतिपिकलेली केळी खाल्ली जात नाहीत. त्यावर काळपट डाग पडू लागतात.

त्यामुळे अनेकजण पिकलेली केळी फेकून देतात.अती पिकलेली केळी फेकून न देता. आपण ४ गोष्टींसाठी ही केळी वापरु शकतो(Use overripe bananas to make a home-made face pack!).

मटकीला भरपूर आणि लांबसडक मोड येण्यासाठी १ सोपी ट्रिक, मटकीची उसळ होईल चविष्ट

कोलेजन फेसपॅक

अतिपिकलेल्या केळ्यांचा वापर करून आपण कोलेजन बूस्टर फेसपॅक बनवू शकता. यासाठी पिकलेले केळं मॅश करा, त्यात मध मिक्स करून चेहऱ्याला लावा. आता हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील पोटॅशियम, रक्त परिसंचरण सुधारते, यासह कोलेजन वाढण्यास मदत होते.

केळीचे बनवा उटणे

केळी जास्त पिकल्यावर त्याची पेस्ट बनवून शरीरावर लावू शकता. शरीरातील घाण साफ करण्यासोबतच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते. यासाठी एक केळं घ्या, ते मॅश करा आणि त्यात बेसन घालून मिक्स करा. आंघोळ करण्यापूर्वी अंगावर लावा. काही वेळानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा.

पिंपल्स-दुखरे फोड-निस्तेज चेहरा? तुळशीची मुठभर पानं घ्या करा ४ उपाय, चेहरा उजळेल चटकन

केळीचा हेअर मास्क

हेअर मास्कसाठी २ पिकलेली केळी एकत्र मॅश करा, त्यात १ चमचा खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल आणि मध घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना आणि टाळूवर लावा. १० मिनिटानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा.

फक्त चिमूटभर हळद आहे? 'असा ' करा उपयोग मिळवा इन्स्टंट ग्लो घरी आणि झटपट

शेक किंवा कस्टर्ड बनवा

पिकलेल्या केळीचा वापर करून आपण शेक किंवा कस्टर्ड बनवू शकता. हे खाल्ल्याने पोट निरोगी राहण्यास आणि पचनक्रिया गतिमान होण्यास मदत होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी