Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीत चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो, फक्त रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दुधात 'ही ' चिमुटभर गोष्ट घालून लावा..

दिवाळीत चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो, फक्त रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दुधात 'ही ' चिमुटभर गोष्ट घालून लावा..

Use Raw Milk and Turmeric on Face For Glowing Skin : कच्च्या दुधात मिसळून लावा एक चिमुटभर गोष्ट, दिवाळीपर्यंत चेहऱ्यावर येईल सोनेरी चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 04:55 PM2023-10-30T16:55:56+5:302023-10-30T16:56:42+5:30

Use Raw Milk and Turmeric on Face For Glowing Skin : कच्च्या दुधात मिसळून लावा एक चिमुटभर गोष्ट, दिवाळीपर्यंत चेहऱ्यावर येईल सोनेरी चमक

Use Raw Milk and Turmeric on Face For Glowing Skin | दिवाळीत चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो, फक्त रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दुधात 'ही ' चिमुटभर गोष्ट घालून लावा..

दिवाळीत चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो, फक्त रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दुधात 'ही ' चिमुटभर गोष्ट घालून लावा..

चेहरा सुंदर, चमकदार, चारचौघात उठून दिसावे म्हणून बरेच जण विविध उपाय करून पाहतात. पण प्रॉडक्ट्सपेक्षा नैसर्गिक उपाय चेहऱ्यावर उत्तमरित्या काम करतात. त्यातीलच एक सोपा उपाय म्हणजे दूध आणि हळदीचा गोल्डन उपाय. दुधात असलेले लॅक्टिक ॲसिड चेहऱ्याचे छिद्र साफ करण्यास मदत करतात. ज्यामुळे स्किन क्लिअर होते. या शिवाय दुधात अँटी एजिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.

हळदीचा वापर फक्त जेवणात होत नसून, स्किनवर देखील होते. हळदीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. जे स्किनसाठी उत्तम मानले जाते. सध्या महिलांमध्ये दिवाळीची रेलचेल सुरु आहे. जर आपल्याला नैसर्गिक गोल्डन ग्लो हवं असेल तर, चेहऱ्यावर गोल्डन मिल्क लावा(Use Raw Milk and Turmeric on Face For Glowing Skin).

चेहऱ्यावर गोल्डन मिल्क कसे लावावे?

एका वाटीत २ चमचे कच्चे दूध घ्या. त्यात चिमुटभर हळद मिक्स करा, व तयार पेस्ट झोपण्यापूर्वी कॉटन बॉल किंवा स्वच्छ हाताने चेहऱ्यावर लावा. नंतर हलक्या हाताने सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. त्वचेवरील मिश्रण सुकल्यानंतर झोपून जा. सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. एका आठवड्यात आपल्याला फरक दिसेल.

केस अकाली पांढरे झालेत? हेअर डाय-मेहेंदीचं झंझट सोडा, फक्त खोबरेल तेलात २ गोष्टी मिसळून लावा, मग बघा जादू

त्वचेवर गोल्डन मिल्क लावण्याचे फायदे

डार्क सर्कल कमी करते

डोळ्यांभोवती अनेक कारणास्तव डार्क सर्कल निर्माण होते. ज्यामुळे त्वचेचा ग्लो काही अंशी कमी होते. गोल्डन मिल्क चेहऱ्यावर लाइटनिंग एजंट म्हणून काम करते. ज्यामुळे चेहऱ्यावरील ब्लड सर्क्युलेशन वाढते. ज्यामुळे डार्क सर्कल कमी होतात.

मुरुमांचे डाग कमी करते

पुरळ त्वचेवर हलके काळे किंवा गडद लाल रंगाचे हट्टी खुणा सोडतात. जे लवकर जात नाही. अशा वेळी गोल्डन मिल्क आपल्याला मदत करू शकेल. हळद मुरुमांचे डाग कमी करण्यास मदत करतील. तर, दुधामध्ये असलेले एक्सफोलिएटिंग गुणधर्म हळूहळू काळे डाग हलके करतात.

चेहऱ्यावर काळे डाग पडल्यानं त्वचा खराब-कोरडी दिसते? १० रुपये खर्च-करा ३ सोपे उपाय

नैसर्गिक ग्लो

नियमितपणे चेहऱ्यावर गोल्डन मिल्क लावल्याने, त्वचेची नैसर्गिक चमक टिकून राहण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट कंपाऊंड असतात. जे हायपरपिग्मेंटेशन कमी करतात. तर दुधातील एक्सफोलिएटिंग गुणधर्म त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणण्याचं काम करतात.

Web Title: Use Raw Milk and Turmeric on Face For Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.