Lokmat Sakhi >Beauty > आजीच्या बटव्यातली शिकेकाई वापरा केस होतील काळे, गळणंही होईल कमी! बघा कशी वापरायची शिकेकाई

आजीच्या बटव्यातली शिकेकाई वापरा केस होतील काळे, गळणंही होईल कमी! बघा कशी वापरायची शिकेकाई

Shikakai – Uses, Benefits, and more केमिकल केसांना चोपडण्यापेक्षा शिकेकाई पारंपरिक पद्धतीने वापरुन पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2023 06:30 PM2023-02-06T18:30:31+5:302023-02-06T18:42:58+5:30

Shikakai – Uses, Benefits, and more केमिकल केसांना चोपडण्यापेक्षा शिकेकाई पारंपरिक पद्धतीने वापरुन पाहा

Use shikekai from grandma's bag, hair will be black, shedding will also be reduced! Learn how to use Shikekai | आजीच्या बटव्यातली शिकेकाई वापरा केस होतील काळे, गळणंही होईल कमी! बघा कशी वापरायची शिकेकाई

आजीच्या बटव्यातली शिकेकाई वापरा केस होतील काळे, गळणंही होईल कमी! बघा कशी वापरायची शिकेकाई

केसांसाठी शिकेकाई ही एक वरदान म्हणून काम करते. शिकेकाई एक नैसर्गिक औषधी वनस्पती असून, तिला आयुर्वेदातही विशेष महत्त्व आहे. शिकेकाईचा वापर भारतात शतकानुशतकेपासून करण्यात आला आहे. यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात. केसांची योग्य निगा राखण्यासाठी शिकेकाई हा बेस्ट ऑप्शन आहे. शिकेकाई केसांवर लावल्याने केसांमध्ये अनेक बदल घडतात.

केसांच्या अनेक समस्या जसे की, केस पांढरे होणे, कोंड्यामुळे केस गळती, केस कोरडे निर्जीव होणे. अशा अनेक समस्यांवर शिकेकाई हा उपाय गुणकारी ठरला आहे. काहींचे वयोमानानुसार लवकर केस पांढरे होतात. केस नैसर्गिक काळेभोर बनवण्यासाठी शिकेकाईचा वापर करणे केव्हाही उत्तम. कारण रासायनिक केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा नैसर्गिक उपायांचा वापर करून पाहा. याने केसांच्या समस्येपासून नक्की सुटका मिळेल.

पांढरे केस काळे करण्यास उपयुक्त

शिकेकाईमुळे केसांना नवीन जीवन मिळते. यासाठी शिकेकाई पावडरसोबत मेहंदी, आवळा आणि कॉफी मिसळून केसांवर लावा. याने केसांना नैसर्गिक चमक मिळेल. याने केसांचे रंग राखण्यास मदत होईल यासह त्यातील अँटिऑक्सिडंट केसांना पोषण देईल. ज्यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत मिळेल.

डोक्यातील कोंडा काढण्यास मदतगार

केसात कोंडा होण्याची समस्या महिलांसाठी सामान्य आहे. मात्र, कधी कधी कोंडा हा त्रासदायक ठरतो. केसांवर शिकेकाई लावल्याने कोंडा दूर होतो. त्यातील अँटीफंगल गुणधर्म टाळूवरील कोंडा कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे केसांमधील रक्त परिसंचरण सुधारते. यासाठी कांद्याच्या रसात शिकेकाई मिसळून केसांवर लावा. याने कोंडा कमी होईल व केसांना नवी शाईन मिळेल.

केस गळणे कमी करते

शिकेकाई व्हिटॅमिन सी, ए, ई आणि के व इतर सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहे. जे आपल्या केसांच्या टाळूचे संरक्षण करते, व केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. याशिवाय केसांचे रक्ताभिसरणही चांगले होते, ज्यामुळे केस गळणे कमी होते. यासाठी आवळा पावडरमध्ये शिकेकाई मिसळा आणि आठवड्यातून एकदा केसांना लावा. याने केस गळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

Web Title: Use shikekai from grandma's bag, hair will be black, shedding will also be reduced! Learn how to use Shikekai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.