Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीत फिल्टर न लावता इन्स्टावर चमकेल चेहऱ्यावरचा ग्लो ! बिटाच्या साली फेकू नका, पाहा 3 उपाय...

दिवाळीत फिल्टर न लावता इन्स्टावर चमकेल चेहऱ्यावरचा ग्लो ! बिटाच्या साली फेकू नका, पाहा 3 उपाय...

Beetroot Skin Care for Glowing Skin & Permanent Skin Whitening : बिटाची सालं काढून फेकू नका, हे घ्या ३ सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 07:40 PM2023-11-01T19:40:23+5:302023-11-01T20:07:49+5:30

Beetroot Skin Care for Glowing Skin & Permanent Skin Whitening : बिटाची सालं काढून फेकू नका, हे घ्या ३ सोपे उपाय...

Use these 3 beetroot face masks and get glowing skin, 3 Simple Ways To Prepare Beetroot Face Packs | दिवाळीत फिल्टर न लावता इन्स्टावर चमकेल चेहऱ्यावरचा ग्लो ! बिटाच्या साली फेकू नका, पाहा 3 उपाय...

दिवाळीत फिल्टर न लावता इन्स्टावर चमकेल चेहऱ्यावरचा ग्लो ! बिटाच्या साली फेकू नका, पाहा 3 उपाय...

आरोग्यासोबतच आपली त्वचा आणि चेहराही चमकावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. विशेषत: मुली, स्त्रिया आपल्या चेहऱ्यावर गुलाबी चमक आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत बाजारात विविध प्रकारची उत्पादने मिळतील पण त्यांचे दुष्परिणामही कमी नाहीत. अशा परिस्थितीत नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनांपासून बनवलेल्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. बीटरूटमध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. यात व्हिटॅमिन - बी आणि लोह सारखे घटक असतात. जे त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवते आणि त्वचेचे संरक्षण करते. त्यामुळे चेहऱ्यासाठी बीटरूट (3 Beetroot Face Pack & Skin Care Remedies For Glowing Skin) हा उत्तम पर्याय आहे. त्यात अनेक दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग, कोरडेपणा, मुरुम यांसारख्या समस्या दूर होऊ लागतात(Beetroot Skin Care for Glowing Skin & Permanent Skin Whitening).

सणवार, घरातील खास प्रसंग किंवा काही खास कार्यक्रम असला की घरातील महिलावर्गाची पार्लरला एक तरी चक्कर होतेच. प्रत्येक सणाआधी पार्लरला जाऊन काही बेसिक ब्यूटी ट्रिटमेंट केल्याशिवाय काहींना चैनच पडत नाही. अशा प्रसंगी चेहरा तजेलदार रहावा असं आपल्यालाही वाटत असेल. तर बिटाच्या सालींपासून (Use these 3 beetroot face masks and get glowing skin) बनवलेला हा फेसपॅक तुम्हाला नक्की मदत करेल. यंदाच्या दिवाळी सणाच्या खास दिवशी जर आपल्या त्वचेवर खास गुलाबी ग्लो (Try These Easy Beetroot Face Packs To Achieve A Nourishing And Spotless Skin) हवा असेल तर बीटाच्या साली फेकून न देता त्याचा फेसमास्क बनवण्यासाठी नक्की वापर करावा(3 Simple Ways To Prepare Beetroot Face Packs).

बिटाच्या सालींचा असा करा वापर...   

१. बीटरुट व संत्र्याच्या साली :- बीटरुट व संत्र्याच्या साली काढून त्या उन्हांत व्यवस्थित वाळवून घ्याव्यात. या साली उन्हांत वाळून त्यातील पाण्याचा अंश निघून गेल्यावर त्या कुरकुरीत होतात. या साली मिक्सरमध्ये वाटून त्याची एकदम बारीक पावडर करुन घ्यावी. आता एका बाऊलमध्ये बीटरुट व संत्र्याच्या सालींची पावडर घेऊन त्यात गुलाबपाणी घालावे. आता याची थोडी घट्टसर अशी पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट चेहेऱ्यावर लावून हलक्या हाताने त्वचेचा मसाज करुन घ्यावा. त्यानंतर १० ते १५ मिनिटे ही पेस्ट चेहेऱ्यावर तशीच लावून ठेवावी. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हा फेसमास्क आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा तरी चेहऱ्यावर लावावा. यामुळे आपल्या त्वचेचा रंग उजळ दिसू लागेल. याचबरोबर त्वचेवर एक प्रकारचा ग्लो दिसू लागेल. 

चुकूनही गुलाब पाण्यात हे ४ पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावू नका, ऐन दिवाळीत चेहरा होईल निस्तेज आणि खरखरीत...

२. बीटरुट व लिंबाचा रस :- बीटरुटच्या साली काढून घेतल्यानंतर, एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात या साली २० ते २५ मिनिटे भिजत ठेवाव्यात. हळुहळु या साली आपला लाल रंग पाण्यांत सोडू लागतील. यामुळे बीटरुटच्या सालींचा रंग पाण्यांत उतरेल. त्यानंतर या साली पाण्यातून काढून घ्याव्यात. आता या लाल रंग आलेल्या पाण्यांत लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करुन घ्यावे. आता एक कापसाचा बोळा घेऊन हे मिश्रण चेहेऱ्यावर लावून घ्यावे. २० ते २५ मिनिटे हे चेहेऱ्यावर तसेच लावून ठेवावे. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. अशाप्रकारे आपण बीटरुटच्या सालींचा व लिंबाच्या रसाचा त्वचेसाठी एखाद्या टोनर प्रमाणे वापर करु शकतो. 

शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...

३. बीटरुट व गुलाबपाणी :- बीटरुटचे लहान तुकडे करुन किंवा बीटरुट किसून ते मिक्सरला वाटून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. या घट्टसर पेस्टमध्ये गुलाबपाणी मिसळून घ्यावे. हा बीटरुट व गुलाबपाण्याचा तयार फेसमास्क चेहऱ्यावर लावून घ्यावा. हा फेसमास्क चेहऱ्यावर २० ते २५ मिनिटे तसाच लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्यावा. या फेसमास्क सोबतच आपण ताज्या ताज्या बीटरुटच्या काढलेल्या साली देखील आपल्या चेहऱ्यावर अलगद चोळून लावू शकता.

हिवाळ्यात केसांना तेल लावल्याने खरंच सर्दी - खोकला होतो ? तज्ज्ञ सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत...

Web Title: Use these 3 beetroot face masks and get glowing skin, 3 Simple Ways To Prepare Beetroot Face Packs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.