Join us  

स्वयंपाक घरांतील ४ गोष्टी वापरून बनवा नैसर्गिक हेअर सिरम...केस होतील मुलायम, चमकदार, घनदाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2023 7:12 PM

Homemade Natural Hair Serum : मेथी दाणे, कलौंजी, लवंग, खोबरेल तेल वापरून घरीच बनवा हेअर सिरम... केसांच्या अनेक समस्या एकदाच होतील दूर...

सध्याच्या तरुणाईमध्ये आपण सुंदर दिसावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून पाहिले जातात. याचबरोबर केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत एखाद्याचे लक्ष जावे यासाठी सुद्धा काहीजण आपल्या आरोग्याची विशिष्ट पद्धतीने काळजी घेतात. यासोबतच केस सुंदर दिसावे म्हणून हेअर कलर किंवा त्याला योग्य आकार देऊन वाढवले जातात. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये केसांची चमक कायम रहावी म्हणून बाजारात विविध कंपन्यांचे हेअर सिरम विकत मिळतात. हे हेअर सिरम  वापरल्याने केसांची चमक आपल्याला दिसून येते(How to Make Your Own Hair Serum).

हेअर सीरम एक लिक्विड बेस्ड ट्रिटमेंट आहे. बाहेर विकत मिळणारे महागडे सिरम हे सहसा तेल आणि सिलिकॉन यांना एकत्र करुन बनवलेले असते. तेल आणि सिलिकॉन मिळून केसांवर सुरक्षात्मक थर तयार करतात, ज्यामुळे केसांना गुंतागुंत होण्यापासून रोखता येते. त्याचा वापर केस मऊ, गुळगुळीत आणि चमकदार बनवण्यासाठी केला जातो. केस धुतल्यानंतर किंवा कोणत्याही स्टायलिंग प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापूर्वी केसांवर हेअर सिरम लावले जाते. शॅम्पू आणि कंडिशनर प्रमाणे हे दिवसभर केसांवर राहते. केस कोरडे होणे, केसांचा वारंवार गुंता होणे, केस पातळ होणे, केस चिकट होणे यांसारख्या केसांच्या समस्यांवर हेअर सिरम लावणे फायदेशीर ठरते. परंतु बाजारांतून महागडे हेअर सिरम विकत आणून लावण्यापेक्षा आपण (How to Make Your Own Hair Serum) घरच्या घरी नैसर्गिक हेअर सिरम (These Homemade Hair Serums Will Make Every Day A Good Hair Day) बनवून केसांना लावू शकतो. हे नैसर्गिक घरगुती हेअर सिरम कसे बनवायचे ते पाहूयात(Use these HAIR SERUMS to reduce HAIR FALL, DAMAGE and FRIZZ instantly).

हेअर सिरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. मेथी दाणे - १ टेबलस्पून २. कलौंजी - १ टेबलस्पून३. लवंग - १ ते १२ काड्या४. पाणी - १ ग्लास५. खोबरेल तेल - १ टेबलस्पून 

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

कृती :- 

१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये मेथी दाणे, कलौंजी, लवंग एकत्रित घेऊन ते मंद आचेवर हलकेच भाजून घ्यावे. २. आता हे भाजून घेतल्यानंतर एका मोठ्या डिशमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. ३. हे सगळे जिन्नस थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पूड करून घ्यावी. ४. त्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करत ठेवावे. पाणी व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात ही बारीक वाटून घेतलेली पूड घालावी. ५. हे मिश्रण गरम झाल्यावर त्यात खोबरेल तेल घालावे. ६. त्यानंतर गॅस बंद करून हे हेअर सिरम थोडे थंड होऊ द्यावे. थंड झालेले हे हेअर सिरम एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यावे. 

केसांचं नैसर्गिक सौंदर्य हरवलं ? केसांना लावा ४ प्रकारचे तेल, केस दिसतील काळेभोर - घनदाट..

काळेभोर केस हवे ? तुळशीचा करा 'असा' वापर, केस होतील मऊ मुलायम सुंदर...

हेअर सिरम कसे वापरावे ? 

१. स्प्रे बॉटलमध्ये तयार असलेले हे घरगुती नैसर्गिक हेअर सिरम संपूर्ण केसांवर व केसांच्या मुळांवर स्प्रे करुन घ्यावे. २. हे हेअर सिरम केसांवर स्प्रे केल्यानंतर हलक्या बोटांनी केसांवर मसाज करून घ्यावा. ३. साधारण तासभर हे हेअर सिरम केसांवर तसेच ठेवावे. ४. तासाभरानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत. 

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस...

अशाप्रकारे आपण घरच्या घरी बनवलेल्या नैसर्गिक हेअर सिरमचा वापर करून केसांच्या सौंदर्यात भर पाडू शकतो.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स