Lokmat Sakhi >Beauty > थंडीत केस, त्वचा कोरडी-रखरखीत झाली? लावा १ खास तेल, केस-त्वचा चमकतील, मिळेल पोषण

थंडीत केस, त्वचा कोरडी-रखरखीत झाली? लावा १ खास तेल, केस-त्वचा चमकतील, मिळेल पोषण

Useful Smoothing oil for hair and skin in winter : एकाच तेलात केस आणि त्वचा अशी दोन्हीची काळजी घेता येते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2023 01:42 PM2023-11-24T13:42:45+5:302023-11-24T13:49:39+5:30

Useful Smoothing oil for hair and skin in winter : एकाच तेलात केस आणि त्वचा अशी दोन्हीची काळजी घेता येते.

Useful Smoothing Castor oil for hair and skin in winter :Dry skin and hair in winter? Apply 1 special oil, hair and skin will shine, get nutrition | थंडीत केस, त्वचा कोरडी-रखरखीत झाली? लावा १ खास तेल, केस-त्वचा चमकतील, मिळेल पोषण

थंडीत केस, त्वचा कोरडी-रखरखीत झाली? लावा १ खास तेल, केस-त्वचा चमकतील, मिळेल पोषण

थंडीच्या दिवसांत हवेत मोठ्या प्रमाणात कोरडेपणा असतो. यामुळे त्वचा आणि केस मोठ्या प्रमाणात कोरडे होतात. एकदा त्वचा आणि केस कोरडे व्हायला लागले की ते रुक्ष आणि रखरखीत दिसतात. कोरडी त्वचा थंडीत पांढरट दिसायला लागते आणि त्यामुळे त्यावरची स्कीनही हळूहळू निघाल्यासारखी होते. अशा त्वचेवर मेकअपही नीट बसत नाही. मग त्वचेला सतत मॉईश्चरायजर लावण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. मात्र या मॉईश्चरायजरचा इफेक्ट काही  काळ टिकतो आणि मग तो आपोआप कमी होतो. तसेच या मॉईश्चरायजरची किंमतही खूप जास्त असते (Useful Smoothing Castor oil for hair and skin in winter). 

अशावेळी काही नैसर्गिक उपाय केले तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.  बाजारात सहज मिळणारे एक खास तेल लावल्यास ते त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसांतही चेहऱ्याची त्वचा छान ग्लो करावी यासाठी हे तेल अतिशय उपयुक्त असते. थंडीत केसांतही कोरडेपणामुळे कोंडा होणे, केस झाडूसारखे रुक्ष होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यावरही हे तेल अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे एकाच तेलात केस आणि त्वचा अशी दोन्हीची काळजी घेता येते. आयुर्वेदात अतिशय महत्त्व असलेले एरंडेल तेल हे या दोन्हीसाठी फायदेशीर असून त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास आणि केस मुलायम होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

१. एरंडेल तेल नियमितपणे केस आणि त्वचेला लावल्यास हे दोन्ही मुलायम होण्यास मदत होते. मात्र याचा इफेक्ट दिसण्यास काही कालावधी जावा लागू शकतो. 

२. एरंडेल तेलामध्ये फॅटी आणि रिसिनोलिक अॅसिड असते.चेहऱ्यावरील कोरडी त्वचा गुळगुळीत करण्यास आणि मॉइश्चराइझ करण्यास हे तेल मदत करते. 

३. काळे डाग, डार्क सर्कलवरही एरंडेल तेल लावणे फायदेशीर ठरते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या, बारीक रेषा दूर करण्यासाठी या तेलाचा चांगला फायदा होतो.  

४. केसांचा कोरडेपणा कमी होण्याबरोबरच केसगळती कमी होण्यासाठी आणि केस मजबूत होण्यासाठी एरंडेल तेल लावणे फायद्याचे असते. 

५. एरंडेल तेलामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुण आहेत. यामुळे निर्जीव झालेल्या केसांची चमक पुन्हा येण्यास याचा चांगला उपयोग होतो.  
 

Web Title: Useful Smoothing Castor oil for hair and skin in winter :Dry skin and hair in winter? Apply 1 special oil, hair and skin will shine, get nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.