Lokmat Sakhi >Beauty > cold drink ने कुणी केस धुते का? होय,  केसांवर स्वार नवा भन्नाट ट्रेंड

cold drink ने कुणी केस धुते का? होय,  केसांवर स्वार नवा भन्नाट ट्रेंड

शाम्पूने केस धुतले तरी केस तसेच निस्तेज वाटत आहेत का?... केसांची चमक हरवली असेल, तर हा एक मस्त आणि एकदम थंडा थंडा कुल कुल उपाय करून पहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 02:01 PM2021-07-09T14:01:29+5:302021-07-09T14:14:23+5:30

शाम्पूने केस धुतले तरी केस तसेच निस्तेज वाटत आहेत का?... केसांची चमक हरवली असेल, तर हा एक मस्त आणि एकदम थंडा थंडा कुल कुल उपाय करून पहा...

Uses of cold drink for washing hairs, get shiny and silky hairs | cold drink ने कुणी केस धुते का? होय,  केसांवर स्वार नवा भन्नाट ट्रेंड

cold drink ने कुणी केस धुते का? होय,  केसांवर स्वार नवा भन्नाट ट्रेंड

Highlightsकोल्डड्रिंक्स हे भन्नाट उपयोग ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.केसांवर जर च्युईंगम चिकटले असेल, तर त्या भागावर कोकाकोला टाका. अवघ्या काही मिनिटांतच चिटकलेले च्युईंगम वेगळे होईल.

केसांची समस्या तर आता खूपच कॉमन झाली आहे. माझे केस गळत नाहीत किंवा मला माझ्या केसांबद्दल काहीही तक्रार नाही, असं म्हणणारा एखादाच कुणीतरी सापडू शकेल. प्रदुषण, बदललेली लाईफस्टाईल, ताणतणाव आणि वाढलेली स्ट्रेस लेव्हल, आहारात झालेला बदल अशा  कितीतरी गोष्टी केसांच्या वाढीवर परिणाम करतात. म्हणूनच आता या सगळ्या समस्यांवर हा घ्या एक भन्नाट उपाय....

 

केस चमकदार करण्यासाठी अतिशय स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे आतापर्यंत तुम्ही जो कोक पित होतात, तोच कोका कोला आता केस धुण्यासाठी वापरून पहा. तसंही आपल्याकडे कोल्डड्रिंक्सचे खूप वेगवेगळे उपयोग केले जातात. अनेक वस्तूंवर चढलेला गंज काढण्यासाठी कोकाकोला वापरतात. बऱ्याच वस्तूंवर जमलेले किटन, चिकट मळ काढण्यासाठीही कोक वापरावा असे सांगितले जाते. आपल्याकडे तर चक्क टाॅयलेट क्लिनर म्हणूनही कोल्डड्रिंक्स वापरून पहा, असेही काही जणांनी सांगितले आहे.

 

असे कोल्डड्रिंक्स अनेक फायदे आपल्याला माहिती आहेतच. यात आता नव्याने एका गोष्टीची भर पडली आहे. परदेशात अनेक तरूणी आणि महिला केस धुण्यासाठी चक्क कोकाकोला वापरतात. त्या महिलांचे असे म्हणणे आहे, की शाम्पू करून केसांना जी चमक यायची नाही, ती चमक कोकाकोलाचा वापर केल्याने दिसते आहे. आठवड्यातून एकदा जर कोकने केस धुतले तर निश्चितच तुम्ही तुमच्या केसांमध्ये खूपच मोठा परंतू अतिशय चांगला बदल अनुभवू शकाल.

हेअर कलरिंग, स्ट्रेटनिंग, कर्ल अशा बऱ्याच गोष्टी आपण केसांवर ट्राय करून बघत असतो. पण यामुळे केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि केसांचे आरोग्य दिवसेंदिवस खराब होत जाते. पण कोकाकोलामुळे केसांचे आरोग्य चांगले होते, त्यामुळे आम्ही आता पिण्यासाठीही आणि केस धुण्यासाठीही कोक आवर्जून आणतो आणि वापरतो असे या तरूणींचे म्हणणे आहे.

 

कसा करायचा वापर
मध्यम लांबीच्या केसांसाठी एक मोठा बाऊलभरून कोकाकोला घ्यावा. सगळ्यात आधी गरम पाण्याने केस ओले करून घेतल्यावर कोकाकाेला केसांवर टाकावा आणि केस चोळावेत. यानंतर पुन्हा एकदा केसांना शाम्पू करावा. 

 

केसांना च्युईंगम चिकटले तरी कोला वापरा
केसांना जर च्युईंगम चिकटले तर ते काढून टाकणे मोठे कठीण काम आहे. अशा घटनांमध्ये केस डायरेक्ट कापावेच लागतात, असे आपण पुष्कळदा ऐकलेले आहे. पण यावरचा रामबाण इलाजही कोकमध्ये दडलेला आहे बरं का.. केसांवर जर च्युईंगम चिकटले असेल, तर त्या भागावर कोकाकोला टाका. अवघ्या काही मिनिटात तुम्हाला अगदी सहजपणे च्युईंगम केसांपासून अलग करता येईल.

 

Web Title: Uses of cold drink for washing hairs, get shiny and silky hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.