आजकाल प्रत्येक जण केसांच्या वेगवेगळ्या समस्येने हैराण झालेला आहे. कुणाचे केस गळत आहे, तर कुणाचे केस अकाली पांढरे होत आहेत. कुणी केसांच्या रूक्षपणामुळे आणि कोरडेपणामुळे परेशान आहे, तर कुणाच्या केसांची वाढच खुंटली आहे. म्हणूनच केसांच्या अशा कोणत्याही समस्या असतील, तर कढीपत्त्यापासून घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने हेअर मास्क बनवा आणि अवघ्या काही दिवसांतच लांब, काळेभोर, घनदाट आणि चमकदार केस मिळवा
कढीपत्ता हेअरमास्क बनविण्याची सोपी पद्धत१. कढीपत्ता- दही हेअर मास्ककढीपत्ता आणि दही यापासून बनविलेला हेअर मास्क वापरला तर कोंड्याची समस्या झटकन दूर होते. केसातील कोंडा घालविण्यासाठी अनेक जण केसांना दही, लिंबू हे पदार्थ लावत असतात. पण दह्यासोबत जर कढीपत्त्याचाही वापर केला तर तो निश्चितच अधिक प्रभावी ठरतो.कढीपत्ता- दही हेअर मास्क वापरण्यासाठी सगळ्यात आधी कढीपत्त्याची मोठी वाटी भरून फ्रेश पाने घ्या. पाने चांगली धूवून घ्या. यानंतर ही पाने आणि दोन ते तीन चमचे दही असे एकत्रित करून मिक्सरमधून वाटून घ्या. केसांची लांबी जास्त असेल तर कढीपत्त्याची पाने आणि दही यांचे प्रमाण वाढवून घ्या. हा हेअर मास्क डोक्याच्या त्वचेला हलक्या हाताने लावा आणि २० ते ३० मिनिटे तसाच राहू द्या. यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे काेंड्याची समस्या दूर होऊन केसांची वाढ चांगली आणि निरोगी होईल.
२. कढीपत्ता आणि कांदा हेअर मास्ककेसांची वाढ होण्यासाठी कांद्याचा रस केसांच्या मुळाजवळ लावला जातो. पण जेव्हा कांदा आणि कढीपत्ता यांचा एकत्रित वापर केला जातो, तेव्हा अधिक जलद परिणाम दिसून येतो. हा मास्क तयार करण्याची पद्धतही अत्यंत सोपी आहे. साधारण मोठी वाटीभरून कढीपत्त्याची पाने आणि एक मध्यम आकाराचा कांदा हे दोन्ही एकत्रितपणे मिक्सरमधून वाटून घ्या. हे मिश्रण हळूवार हाताने केसांच्या मुळाजवळ लावा. यामुळे केस मुलायम, लांब आणि घनदाट होतील. शिवाय केस अकाली पांढरेही होणार नाहीत.