Lokmat Sakhi >Beauty > फक्त ५ रूपयांच्या तुरटीने पांढरे केस होतील काळे; सुरकुत्या-पिंपल्सही होतील दूर, असा करा वापर

फक्त ५ रूपयांच्या तुरटीने पांढरे केस होतील काळे; सुरकुत्या-पिंपल्सही होतील दूर, असा करा वापर

Uses of alum fitkari or alum : डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे आणि सूजही कमी होते. तुरटी चेहरा आणि केसांसाठी कशी फायदेशीर ठरते ते पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:25 PM2023-08-21T12:25:27+5:302023-08-21T15:49:36+5:30

Uses of alum fitkari or alum : डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे आणि सूजही कमी होते. तुरटी चेहरा आणि केसांसाठी कशी फायदेशीर ठरते ते पाहूया.

Uses of alum fitkari : How to use fitkari or alum for skin and hairs benefits of fitkari | फक्त ५ रूपयांच्या तुरटीने पांढरे केस होतील काळे; सुरकुत्या-पिंपल्सही होतील दूर, असा करा वापर

फक्त ५ रूपयांच्या तुरटीने पांढरे केस होतील काळे; सुरकुत्या-पिंपल्सही होतील दूर, असा करा वापर

छोटासा तुरटीचा खडा त्वचा आणि केसांसाठी बराच फायदेशीर ठरतो प्रत्येक पुरूषाच्या शेविंग किटमध्ये तुरटी असतेच कारण तुरटी शरीरात वाहणारा रक्तस्त्राव नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. (Amazing Phitkari Benefits & Uses For Skin & Hair) तुरटीचा वापर त्वचेवर केल्यानं अनेक फायदे मिळतात. (How to use fitkari or alum for skin and hairs) इतर ब्युटी प्रोडक्टसबरोबर तुरटी वापरल्याने केवळ डाग-पिंपल्सचं दूर होत नाहीत तर सुरकुत्याही दूर होतात. याशिवाय डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे आणि सूजही कमी होते. तुरटी चेहरा आणि केसांसाठी कशी फायदेशीर ठरते ते पाहूया. (Uses of alum fitkari)

डार्क स्पॉट्स आणि डोळ्याची सूज कमी होते

डोळ्यांखाली जर सुज आली असेल तर तुरटी आणि गुलाबपाण्याचं मिश्रण फायदेशीर ठरू शकतं. याची खासियत अशी की तुरटी त्वचेवर लावल्यानं कोणत्याही प्रकारचं इरिटेशन होत नाही.  तुरटीच्या पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून १० मिनिटांसाठी तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय  केल्याने तुम्हाला काही दिवसातच फरक दिसून येईल.

त्वचेचा पोत सुधारतो

चेहऱ्याची त्वचा सैल झाल्यासारखी दिसत असेल तर तुरटीचं टोनर तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.  हे टोनर बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुरटी पाण्यात घाला. त्यात तुळशीची पानंही तुम्ही घालू शकता.  त्यासाठी पाणी उकळून घ्या. पाणी उकळल्यानंतर तुरटी पाण्यात मिसळा आणि नंतर गॅस बंद करून हे पाणी गाळून घ्या. यात काही थेंब ग्लिसरिन मिसळून काचेच्या बरणीत ठेवा. टोनरच्या स्वरूपात तुम्ही हे द्रावण चेहऱ्याला लावू शकता. 

डाग निघून जातात

चेहऱ्यावरचे डाग काढून टाकण्यासाठी तुरटी आणि मुल्तानी माती मिसळून चेहऱ्याला लावा. हा पॅक तयार करण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये मुल्तानी माती मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दूधाबरोबर मिसळून चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे डाग निघून जाण्यास मदत होईल.

नारळाच्या तेलात तुरटी मिसळून लावा

नारळाच्या तेलात तुरटी मिसळून चेहऱ्याला लावल्याने अनेक फायदे मिळतात यामुळे केस काळे होतात. याशिवाय स्काल्प पोर्स खोलून केस वाढवण्यास मदत  करते. नारळाचं तेल केसांना हेल्दी बनवण्यासाठी  फायदेशीर ठरते. 

तुरटी आणि मेहेंदी

मेहेंदीत तुरटी मिसळून चेहऱ्याला लावल्याने केस काळे होण्यास मदत होते. यामुळे केस चांगले राहतात. याशिवाय केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो. तुरटीचं पाणी गरम करून ठेवा नंतर हे पाणी गाळून केसांना लावा. यामुळे केसांचा टेक्सचर चांगला राहील.

Web Title: Uses of alum fitkari : How to use fitkari or alum for skin and hairs benefits of fitkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.