Lokmat Sakhi >Beauty > मेकअप करायचाय पण मेकअप किट नाही ? फक्त लिपस्टिक, काजळ वापरुन झटकन करा मेकअप, दिसा कातील...

मेकअप करायचाय पण मेकअप किट नाही ? फक्त लिपस्टिक, काजळ वापरुन झटकन करा मेकअप, दिसा कातील...

Ultimate Makeup Hack: How to Do an Entire Makeup with One Lipstick Only : मेकअप किटमधील लिपस्टिक, मेकअप पावडर, काजळ, आयलायनर इतक्या बेसिक गोष्टी वापरून देखील आपण झटपट मेकअप रेडी होऊ शकतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 08:02 PM2023-10-20T20:02:51+5:302023-10-20T20:19:15+5:30

Ultimate Makeup Hack: How to Do an Entire Makeup with One Lipstick Only : मेकअप किटमधील लिपस्टिक, मेकअप पावडर, काजळ, आयलायनर इतक्या बेसिक गोष्टी वापरून देखील आपण झटपट मेकअप रेडी होऊ शकतो...

Using Lipstick and Nothing Else To Create a Full Face of Makeup, Ultimate Makeup Hack: How to Do an Entire Makeup with One Lipstick Only | मेकअप करायचाय पण मेकअप किट नाही ? फक्त लिपस्टिक, काजळ वापरुन झटकन करा मेकअप, दिसा कातील...

मेकअप करायचाय पण मेकअप किट नाही ? फक्त लिपस्टिक, काजळ वापरुन झटकन करा मेकअप, दिसा कातील...

'मेकअप करणे' हा प्रत्येकजणीचा अतिशय आवडता विषय आहे. कुठल्याही खास प्रसंगी किंवा सणावाराला मेकअप करुन नटून - थटून जाणे सगळ्याचजणींना आवडते. आपल्यापैकी प्रत्येकीच्या पर्समध्ये एक छोटा आयत्यावेळी लागणारा मेकअप किट हा कायम असतोच. या मेकअप किटमध्ये मेकअपचे संपूर्ण साहित्य जरी नसले तरीही (How to do makeup with lipstick & kajal only?) लिपस्टिक, मेकअप पावडर, काजळ, आयलायनर इतक्या बेसिक गोष्टी तर नक्की असतात(Full Makeup Only Using LIPSTICK & Kajal).

काहीवेळा आपल्याला कामाच्या घाई - गडबडीत मेकअप करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. याचबरोबर कधीतरी एखादा असा प्रसंग येतो की आपल्याला पटकन मेकअप करून आवरुन तयार व्हावे लागते. अशा घाईच्या वेळी प्रत्येकवेळी आपल्याकडे संपूर्ण मेकअप किट (How, with one lipstick, you can do an entire makeup look) असेलच असे नाही. अशा परिस्थिती आपण काय करावे हे आपल्याला सुचत नाही. याउलट आपण आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या बेसिक साहित्यात मेकअप करणे (Get a Full Face of Makeup With 1 Lipstick) याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नसतो. जर आपण घराबाहेर असाल, अचानक कुठेतरी जाण्याचा प्लॅन झाला अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे मेकअपसाठी फाउंडेशन, आयलाइनर, बेस, कन्सीलर, ब्लश किंवा हायलाइटर नसेल तर तुम्ही काय करू शकता ? यासाठी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात झटपट सुंदर मेकअप कसा करावा यासाठी काही खास टिप्स फॉलो करुयात(Ultimate Makeup Hack: How to Do an Entire Makeup with One Lipstick Only?). 

मेकअप करण्यासाठी मेकअप किट नसल्यास असा करा मेकअप... 

१. सर्वप्रथम ओल्या वाइप्सने चेहरा स्वच्छ करा. जर ओले वाइप्स उपलब्ध नसतील तर आपला रुमाल थोडासा ओला करून चेहरा स्वच्छ करा. याउलट आपण साध्या पाण्याने देखील चेहरा धुवून स्वच्छ करु शकता. 

२. चेहरा स्वच्छ पुसून संपूर्ण कोरडा करून घ्यावा. फेसपावडर असेल तर चेहऱ्यावर लावा.

३. सगळ्यांत आधी डोळ्यांना काजळ लावा. यासोबत आय लायनरही लावा. शार्प विंग लायनर देखील पेन्सिल काजळसोबत अतिशय सुबकपणे लावता येते. 

ओपन पोर्समुळे चेहरा सतत डल, काळपट दिसतो ? ओपन पोर्स नैसर्गिकरित्या बंद करण्याचे ४ सोपे घरगुती उपाय...

सुंदर त्वचेसाठी आता पार्लरमध्ये का जायचं ? सोप्या ५ गोष्टी करा फॉलो, घरीच मिळवा पार्लरसारखी ग्लोइंग त्वचा...

४. आयब्रो पेन्सिल नसल्यास हलकेसे काजळ बोटांवर घेऊन भुवयांवर लावून भुवयांना शेप देऊ शकता. यासाठी तुम्हाला वेगळ्या आयब्रो पेन्सिलची गरज लागणार नाही. 

५. त्यानंतर ओठांवर लिपस्टिक लावून घ्यावी. 

काजळ जरुर लावा, पण हमखास होणारी १ चूक टाळा, नाहीतर डोळे व आजूबाजूची त्वचा होईल खराब...

६. हीच लिपस्टिक थोडीशी बोटावर लावून घ्या आणि त्याचा हलकासा थर पापणीवर लावा, यासाठी वेगळे आयशॅडो लावण्याची गरज भासणार नाही. 

७. डोळ्यांप्रमाणेच गालावर लिपस्टिकची हलकी शेड लावा. गालावर लिपस्टिक लावताना ती जास्त डार्क नसावी हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे लिपस्टिकच्या मदतीने गालावर हलका ब्लश द्या.

'जेड रोलर' म्हणजे काय ? त्यानं चेहऱ्याला मसाज केला तर चेहऱ्याच्या सगळ्या समस्या गायब होतात, हे खरं आहे ?

८. जर आपल्याला छोटीशी टिकली लावायची असल्यास आणि आपल्याकडे टिकली नसल्यास लिपस्टिक किंवा काजळाचा छोटासा डॉट देऊन आपण कपाळावर छानशी टिकली काढू शकता. 

अशाप्रकारे मेकअप किटशिवाय आपण आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या नेहमीच्या बेसिक साहित्यात झटपट मेकअप करु शकता.

Web Title: Using Lipstick and Nothing Else To Create a Full Face of Makeup, Ultimate Makeup Hack: How to Do an Entire Makeup with One Lipstick Only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.