बॉलीवूडची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) सध्या शमशेरा (Shamshera) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.. ती आणि चित्रपटाचा अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे दोघेही सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या प्रमोशनल ॲक्टीव्हिटी सारख्या सुरूच असतात. यासगळ्या भरगच्च कार्यक्रमांमध्ये वाणी कपूर आणि तिचा लूक या गोष्टी नेहमीच उठून दिसत आहेत. सध्या तिचा असाच एक लूक जबरदस्त व्हायरल झाला असून यामध्ये ती अतिशय स्टनिंग, स्टायलिश दिसत आहे. (olive green ruffled saree worth Rs. 55K)
चित्रपटाच्या प्रमोशन संदर्भातला एक कार्यक्रम नुकताच मुंबई येथे पार पडला. यावेळी रणबीर कपूरने ग्लॉसी काळ्या रंगातला झब्बा- कुर्ता घातला होता, तर तर वाणीने ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या रफल साडीत अतिशय स्टनिंग लूक केला होता. चित्रपटाच्या प्रमोशनबाबत असणारी एक्साईटमेंट आणि एकंदरीतच तिच्या देहबोलीत असणारा एकप्रकारचा ग्रेस यामुळे वाणी कमालीची आकर्षक भासत होती. अर्थात तिच्या मुळ सौंदर्याला चार चाँद लावण्याचं काम करत होती ती तिची हिरवी साडी.
वाणीच्या साडीची खासियत
वाणीची ही साडी अर्थातच रफल प्रकारातली असून या साडीची किंमत तब्बल ५५ हजार रुपये आहे. ही तिची साडी डिझायनर अर्पिता मेहता यांच्या कलेक्शनमधली असून साडी आणि ब्लाऊज हे दोन्हीही ऑलिव्ह ग्रीन या एकाच रंगातलं आहे. bralette blouse आणि हिरव्या रंगाचे कानातले एवढेच दागिने तिने घातले आहेत, तरीही तिचा हा हा monotone look अतिशय क्लासी वाटत आहे.
रफल साडीचा ट्रेण्ड सध्या एवढा का गाजतोय?
टिपिकल साड्यांपेक्षा रफल साडीचा लूकच अतिशय वेगळा आहे. टिपिकल साड्यांमध्ये मग त्या डिझायनर वेअर असल्या तरी त्यांच्यात एक विशिष्ट प्रकारचा टिपिकलपणा वाटतो. तो प्रकार रफल साड्यांमध्ये नसून त्यांचा लूकच पुर्णपणे फ्रेश आणि नविन आहे.
मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!
रफल साड्या या शिफॉन किंवा जॉर्जेटसारख्या पातळ कपड्यांत मिळतात. या साड्यांना खालच्या बाजूने पुर्णपणे झालर असते. आता काही साड्यांच्या पदरावरही झालर असते तर काही साड्यांची फक्त खालची बाजू झालरीची असते. वाणी कपूरने नेसलेली साडी या दुसऱ्या प्रकारातली आहे. या साड्यांना असणाऱ्या फ्रिल किंवा झालरीमुळे साडीला अतिशय हटके लूक मिळतो. त्यामुळेच सध्या बॉलीवूड अभिनेत्रींपासून ते सर्वसामान्य महिलांपर्यंत या साडीची क्रेझ दिसून येते. शिवाय साडी वजनाने हलकी असल्याने कॅरी करायलाही अतिशय सोपी आहे.