आजकालचे नवनवीन ट्रेंड पाहून प्रत्येकालाच सुंदर दिसण्यासाठी ते फॉलो करावेसे वाटते. जेव्हा या ट्रेंडमध्ये अनेक विचित्र गोष्टी दिसतात तेव्हा महिला अनेक ब्यूटी ट्रिटमेंट्सबाबत गोंधळलेल्या असतात. सौंदर्य जग सौंदर्याविषयीचे प्रत्येक स्टिरियोटाइप तोडून पुढे जात आहे. जर आपण नवीन ट्रेंडबद्दल बोललो तर, आजकाल (Vaginal Bleaching) ट्रेंडमध्ये आहे. हे एक विशेष प्रकारचे ब्लीचिंग आहे, जे स्त्रिया त्यांच्या योनीचा काळेपणा दूर करण्यासाठी वापरतात.
काही महिला अजूनही बिकनी वॅक्स करून घेण्यासाठी लाजतात. किंबहूना त्यांना पार्लरमध्ये जाऊन प्रायव्हेट पार्ट्सचं वॅक्स करून घ्यायला आवडत नाही. पण काही महिला आता फक्त वॅक्सिंग नाही तर योनीचं ब्लीचिंगसुद्धा करून घेतात. तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सवर कोणत्याही प्रकारचे उत्पादन वापरू नये असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण हे योनी ब्लिचिंग काय आहे आणि तुम्ही ते करून पहावं का? चला जाणून घेऊया. (Vaginal bleaching benefits and side effect)
काय आहे व्हज्यायनल ब्लिचींग (What Is Vaginal Bleaching)
जर तुमच्या प्रायव्हेट एरियाचा रंगही खूप गडद असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. डॉ. मनोज जोहर, (वरिष्ठ संचालक, सौंदर्य आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार योनीतून ब्लीचिंग ही योनिमार्गाच्या त्वचेचा रंग हलका करण्याची प्रक्रिया आहे.
...म्हणून कमी वयातच घटतो पुरूषांचा स्पर्म काऊंट; चांगल्या Sex Life साठी जाणून घ्या उपाय
या प्रक्रियेत भरपूर टॉपिकल क्रीम्स आणि केमिकल पीलिंग आणि लेसर ट्रीटमेंट वापरली जाते. गेल्या वर्षीपासून या ट्रेंडला अधिक गती मिळाली आहे. आजही काही स्त्रिया शरीराच्या त्वचेचा रंग गोरा करण्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि ब्लीचवरही कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवत नाहीत, परंतु त्यांना त्यांच्या अंडरआर्म्स आणि योनीचा भाग ब्लीच करून घ्यायचा असतो.
यामागचे एक कारण म्हणजे शेविंग केल्यानंतर प्रायव्हेट पार्टची त्वचा काळी पडू लागते. जी प्रत्येक स्त्री आणि मुलीला भेडसावणारी समस्या आहे. त्यामुळे हा ट्रेंड खूप प्रसिद्ध होऊ लागला आणि अनेक स्त्रिया त्याचा वापर करू लागल्या. पण योनी ब्लिचिंगसाठी (Veginal Bleaching) तुम्ही जी काही प्रक्रिया करत आहात, ती अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. अन्यथा त्याचे दुष्परिणामही (Side Effects) होऊ शकतात.
सौंदर्यतज्ज्ञांची माहिती घ्या (Consult With Beauty Expert)
योनीची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मताशिवाय तेथे कोणताही प्रयोग करू नये. जर तुम्हाला या प्रकारच्या ब्लीचमध्ये स्वारस्य असेल, तर तुम्ही ही प्रक्रिया डर्मा क्लिनिकमध्ये किंवा हाय फाय सलूनमध्ये, एखाद्या प्रोफेशनल्सचा सल्ला घेतल्यानंतर करावी. या नाजूक अवयवांसाठी कोणताही धोका पत्करणे योग्य नाही.
स्तनपान करताना अचानक गुलाबी रंगाचं दूध बाहेर आलं; महिलेनं शेअर केला व्हिडीओ
व्हज्यायनल ब्लिचींगचे धोके (Vaginal Bleaching Side Effects)
जरी काही तज्ञांचा असा विश्वास आहे की आपण हे ब्लीच टाळावे. कारण यामुळे तुमच्या योनीच्या त्वचेला आणि व्हल्व्हाला (प्रायव्हेट पार्ट्सचा बाहेरील भाग) खूप त्रास होऊ शकतो. या ब्लीचमुळे तुम्हाला खाज येण्यासोबतच खूप जळजळ जाणवू शकते.
व्हज्यानल ब्लिचिंग करायलाच हवं का? (Should You Try Vaginal Bleaching)
जर तुम्हाला थोडी जळजळ आणि इरिटेशन सहन होत असेल तर थोड्या वेळासाठी, तर तुम्ही हे ब्लीच वापरून पाहू शकता. जर तुम्हाला खाज, जळजळ आणि इरिटेशन सहन होत नसेल तर तुम्ही हे ब्लीच अजिबात ट्राय करू नये.जर तुम्हाला जास्त धोका पत्करायचा नसेल आणि तुमची त्वचा देखील खूप संवेदनशील असेल तर तुम्ही या ब्लीचपासून दूर राहावे. तुमची योनी ज्या स्थितीत आहे तशीच राहूद्या. हेअर रिमूव्हल क्रीम किंवा वॅक्सिंग करण्याचा विचार तुम्ही करू शकता.