व्हॅलेंटाईन्स डे Valentines Day आपल्यातील अनेकांसाठी खास दिवस असतो. वयाचे बंधन न पाळता बरीच जोडपी आपल्या व्हॅलेंटाईनसोबत हा दिवस साजरा करतात. इतकेच नाही तर जगभरात व्हॅलेंटाईन वीकही अतिशय उत्साहात साजरा केला जातो. प्रेमाची कबुली देण्यासाठी साजरा केला जाणारा हा आठवडा आणि १४ फेब्रुवारीचा दिवस खास पद्धतीने सेलिब्रेट केला जातो. अशा या स्पेशल दिवशी आपण सुंदर दिसायला Beauty Tips हवं ना. आपल्या चेहऱ्यावर प्रेमाचा रंग उतरला तर सौंदर्य आहे त्याहून आणखीनच खुलते. आता चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर आपल्याकडे काही ठराविक उत्पादने असायलाच हवीत. ही उत्पादने कोणती आणि त्याचा वापर कसा करायचा याविषयी जाणून घेऊया...
१. Nourish Mantra Youth Restoration Serum
या सिरममुळे चेहऱ्याला वरवर ग्लो येत नाही तर आतूनही त्वचा चांगली राहते आणि दिसते. त्वचेतील कोलाजेनची पातळी वाढण्यासाठी हे सिरम उपयुक्त असून आपले वाढलेले वय चेहऱ्यावर दिसू नये त्यासाठी हे लावणे अतिशय उपयुक्त ठरते. यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा तरुण तर दिसताच पण तुमचा हायपरपिगमेंटेशनचा त्रासही आटोक्यात येण्यास याची मदत होते. त्वचेतील ओलावा कायम राहून चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी हे अतिशय उत्तम उत्पादन आहे.
२. MyGlamm Youthfull- Hydrating Moisturising Gel With Water Bank Technolgy
आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये असायलाच हवे असे हे प्रॉडक्ट आहे. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. हे मॉइश्चरायझिंग जेल त्वचेची खाज, जळजळ कमी करण्यास मदत करते. इतकेच नाही तर या जेलचे टेक्श्चर अतिशय हलके आणि स्मूद आहे, तसेच त्याला चिकटपणाही नसल्याने ते लावल्यावर आपल्याला फ्रेश वाटते.
३. O3+ Vitamin C Glow Peel Off Mask
आपली स्कीन ग्लोइंग आणि चमकदार असेल तर कोणाला नाही आवडणार? सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पील ऑफ मास्क मिळतात. तुम्हाला एखादा कार्यक्रम किंवा खास दिवस सेलिब्रेट करायचा असेल आणि तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर पील ऑफ हा अतिशय उत्तम पर्याय असतो. या पील ऑफमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने पिगमेंटेशन, त्वचेवरील सुरकुत्या यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि ग्लोईंग इफेक्ट असल्याने त्वचेवर एक वेगळी चमक येते.
४. The Body Shop Vitamin E Overnight Serum-In-Oil
रात्री झोपताना हे सिरम कम ऑईल चेहऱ्यावर लावल्यास रात्रभर त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचेवर एकप्रकारची चमक येते. या प्रॉडक्टमुळे त्वचेचे पोषण तर होतेच पण त्याला चिकटपणा नसल्यामुळे आणि वजनाने हलके असल्याने ते चेहऱ्यावर लावल्यासारखेही वाटत नाही.
५. Mellow Herbal Ayurvedic Anti-Acne Face Pack
चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी फेसपॅक अतिशय उत्तम उपाय असतो. चेहऱ्यावर असणाऱ्या पुरळांची समस्या कमी करण्यासाठी या फेसपॅकचा चांगला उपयोग होतो. तसेच त्वचेतून निर्माण होणाऱ्या सिबमची निर्मिती करण्यावर नियंत्रण आणण्यासाठीही हा पॅक उपयुक्त ठरतो. ज्यांची त्वचा खूप तेलकट आहे किंवा ज्यांच्या त्वचेवर पुरळ जास्त प्रमाणात येतात त्यांच्यासाठी हा फेसपॅक अतिशय उत्तम उपाय आहे.